Breaking News

*कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या हद्दीत रिक्त असलेला जागेवर सार्वजनिक सुलभ शौचालय बांधकाम निर्माण करण्याची मागणी* *कन्हान – पिपरी नवयुवक संघर्ष समिती चे नगर परिषद प्रशासना ला निवेदन*

*कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या हद्दीत रिक्त असलेला जागेवर सार्वजनिक सुलभ शौचालय बांधकाम निर्माण करण्याची मागणी*


*कन्हान – पिपरी नवयुवक संघर्ष समिती चे नगर परिषद प्रशासना ला निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान – पिपरी शहरातील सर्वात मोठी समस्या सुलभ शौचालयाची असुन कन्हान ग्रामपंचायत चे नगर परिषद मध्ये रुपांतर होऊन सहा वर्ष झाल्या नंतर सुलभ शौचालय अखेर मागच्या झालेल्या नगर परिषद च्या बैठकी मध्ये मंजुर झाला असुन काही विरोधक जागेचा विरोध करीत असल्याने सुलभ शौचालयाचे निर्माण कार्य थांबलेले असुन नागरिकांनी शौचालयाला जायचे कुठे हा प्रश्न निर्माण होताच कन्हान – पिपरी नवयुवक संघर्ष समिती च्या पदाधिकार्यांनी नगर परिषद चे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे व नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांना भेटुन या विषया वर चर्चा करुन व एक निवेदन देऊन कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या हद्दीत रिक्त असलेला जागेवर सार्वजनिक सुलभ शौचालय बांधकाम निर्माण करण्याची मागणी केली आहे .

निवेदनात सांगितले कि कन्हान ग्रामपंचायत चे रूपांतर नगर परिषद मध्ये होऊन जवळपास सहा व सात वर्ष झाले असुन आजपर्यंत सार्वजनिक सुलभ शौचायल बांधकाम निर्माण झालेल नसुन तालुक्यातील सर्वात मोठी नगरपरीषद असून या शहरामधे मुख्य स्थायी बाजारपेठ असून असंख्य नांगरिकांचे आवागमण वर्दळीचे मुख्य ठिकाण आहे. शहरात सार्वजनिक सुलभ शौचालय निर्माण व्हावे म्हणुन विविध पक्षाचा संघटने द्वारे , नेते मंडळी द्वारे ,पत्रकार बांधवांनी समाजसेवकांनी,जेष्ठ नांगरिकांनी ह्या सर्वात मोठ्या ज्वलंत समस्या बाबद लेखी निवेदन देवुन मागणी करुन जणआंदोलन सुद्धा करण्यात आले . पण आता कन्हान नगर परिषद ला सार्वजनिक सुलभ शौचालय बांधकाम करण्याकरीता निधी (फंड) उपलब्ध झाला आहे ह्यासाठी नगर परिषद च्या हद्दीत विविध ठिकाणी रिक्त जागा उपलब्ध आहेत शासनाचा निधी फंड परत न जाता जर गांधी चौक येथील जुणी ओसाड पडलेली कोंडवाडाची जागा आता रिक्त आहे ह्या ठिकाणी सार्वजनिक सुलभ शौचालयाचे बांधकाम केल्यास नांगरिकांना सोयीस्कर जणहितार्थ सार्थ हाईल .हे लक्षात घेत नवयुवक संघर्ष समिति च्या पदाधिकार्यांनी नगर परिषद चे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे व नगराध्यक्षा करूणा आष्टणकर यांना भेटुन या विषया वर चर्चा करुन व एक निवेदन देऊन कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या हद्दीत रिक्त असलेला जागेवर सार्वजनिक सुलभ शौचालय बांधकाम निर्माण करण्याची मागणी केली आहे करण्यात आली आहे.

या प्रसंगी प्रशांत बाजीराव मसार, अमोल साकोरे , सुनिल पिले , प्रदीप बावणे , अजय चव्हान , नितीन मेश्राम , भरत पगारे ,विलास शेंडे , विपीन गोंडाणे , दिपक तिवाडे , चंदन मेश्राम ,पकंज गजभिए , गणेश भालेकर , कुंदन रामगुडे ,शिवशंकर भोयर ,सोनु मसराम सह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …