*मराठी भाषा दिनानिमित्त*

माय माउली मराठीचे ऋण मानते
कधी शब्दांशी तुझीया मी खेळते ,
तर कधी शब्द तुझे खोडते ,
भोळीभाबडी बिचारी मी ,
शब्दांचा तुझीया , ओलीस जाते .
कधी कुशीत तुझीया कल्पनेला मी शोधते ,
तर कधी बिलगून तुला काव्यात नित्य रमते ,
भोळीभाबडी बिचारी मी ,
अथांग तुझीया प्रतिभेस झुरते .
ऋणी शब्दांची तुझीया मी जाणते ,
माय माऊली मराठीस सदैव धन्य मानते ,
भोळीभाबडी बिचारी मी ,
मराठी भाषे तुझीया सौंदर्याचा जयजयकार करते .
सहाय्यक प्रा .
कु . कामिनी गं . माडेकर
के . डी . पवार शिक्षण महाविद्यालय , सावनेर
मो . नं . 8999363614
मेल आई डी madekarkamini123@gmail.com
Maharashtra News Media सच की आवाज