*सावनेर शहरात मोबाईल व्हँन व्दारा प्रत्येक परिसरात कोवीड़19 टेस्टींग सुरु*
*स्थानिक प्रशासन, नगर प्रशासन व आरोग्य विभागाचे संयुक्तिक उपक्रम*
*पहिल्या चरणात वार्ड क्र.8 मधिल नाईक लेआऊट, राधाकृष्ण मंदिर,महाजन लेआऊट,खेडकर लेआऊट, विंचूरकर लेआऊट,लाड लेआऊट,दत्त मंदिर परिसरातुन कोवीड़ 19 च्या अँन्टिजन टेस्टींग ला सुरुवात 93 नागरिकांनी नोंदवली उपस्थिती*
सावनेरः शहरात दररोज वरच्यावर कोरोना पाँझेटिव्ह रुग्ण निघत असुन शासनाच्या दिशानिर्देशानुसार विस लोकांच्या संपर्क खात्री करण्यात येत असलेल्या अडचणी तसेच नागरिकांचा तपासणी पासुनचा दुरावा अथवा गैरसमज दुर करण्याच्या हेतूने सावनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,तहसीलदार चैताली दराडे प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण केन्द्राचे प्रपाठक पवन मेश्राम,नगर पालिकेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे आदिंच्या प्रयत्नातून आज दि.2 मार्च पासुन सावनेर शहरातील अधिक कोरोना पाँझेटिव्ह रुग्ण असलेल्या प्रभागातील नागरिकांना त्यांच्याच परिसरात पोहचुन दुसऱ्या चरणात वाढत्या कोरोना विषयी जनजागृती तसेच तपासणी या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
*आज सकाळी 9-00 वाजताचे सुमारास उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,तहसीलदार चैताली दराडे,नगर प्रशासन, आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी,नगरसेवक आदिंच्या प्रमुख उपस्थितीत शिव मंदिर परिसर छिंदवाडा रोड वार्ड क्र.8 चे नाईक लेआऊट येथून सदर कोवीड़19 च्या तपासणीला सुरुवात करण्यात आली असुन पहिल्या टप्प्यात कोरोना पाँझेटिव्ह रुग्णांची उपस्थिती असणाऱ्या राधाकृष्ण मंदिर, महाजन लेआऊट, खेडेकर लेआऊट, विंचूरकर लेआऊट, लाड लेआऊट, दत्त मंदिर इत्यादी परिसरात मोबाईल व्हँन मधेच कोवीड़19 ची अँन्टिजन तपासणीची व्यवस्था करण्यात आली असुन “कोवीड़19 तपासणी आपल्या व्दारी” या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून सदर आयोजनामुळे नागरिकात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असुन अनेक नागरिक स्वयःफुर्तीने टेस्टींग करुण घेत आहे*
*टेस्टींग आपल्या दारी या उपक्रमाच्या सुरुवातीप्रसंगी नगर पालेकेचे वरिष्ठ व कोवीड़ प्रबंधक दिनेश बुधे,अभियंता पुरुषोत्तम पांडे,प्रदिप गवई, शेषराव वाढिकर,विनायक पोटोडे, अशोक मेंन्ढे, शंकर चाफेकर,धिरज देशमुख, आकाश नाईक,सुरज ढोके,नाही नितराज मतेल,प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेरचे डॉ. प्रितम निचट,डॉ. संदीप गुजर,ज्ञानेश्वरी खुणे,अतुल पारधी, सुजित झाडे सह नगरसेवक निलेश पटे,माजी नगरसेवक लक्ष्मिकांत दिवटे इत्यादी प्रमुख्याने उपस्थित राहून परिश्रम घेत आहे*
*शेवटचे वुत्त हाती आले तोपर्यंत 93 नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवुन तपासण्या केल्या असुन ठाराविक वेळेत जवळपास 150 तपासण्या होण्याचा अंदाज डॉ. प्रितम निचट यांनी व्यक्त केला.तर सदर आयोजनाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आव्हान उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केले आहे*
Maharashtra News Media सच की आवाज