Breaking News

*मंगसा येथील विजयलक्ष्मी जिनिंग मधे लागली आग* *आगीत सात हजार क्विंटल कापुस व चार हजार क्विंटल सरकी जळल्याने अंदाजे सात कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज*

*मंगसा येथील विजयलक्ष्मी जिनिंग मधे लागली आग*

*आगीत सात हजार क्विंटल कापुस व चार हजार क्विंटल सरकी जळल्याने अंदाजे सात कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज*

 

मुख्य संपादक- किशोर ढूंढेले

सावनेरः सावनेर मुख्यालयापासुन पाच की.मी.अंतरावर असलेल्या मंगसा येथील विजयलक्ष्मी जीनींग मधे दी.2 मार्चला सायंकाळी 7-00 चे दरम्यान आग लागल्याने सात क्विंटल कापूस व चार क्विंटल सरकी जळून खाक झाल्याचे वुत्त आहे।

*मिळालेल्या माहितीनुसार राजेश पवार, राजु सावंत व अरुण सिंघानीया या तीघांच्या मालकीच्या असलेल्या सदर जीनींग मधे दोन मार्च ला सायंकाळी सातचे दरम्यान जीनींग मधे असलेल्या कापसावर प्रक्रिया करण्याकरिता ब्लाँक लोडरच्या सहाय्याने नेत असतांना ब्लाँक लोडर च्या बँटरीमधे शाँर्ट सर्किट होऊण त्याची ठीणगी कापसावर पडल्याने सदर अप्रीय घटना घडल्याची माहीतु उघडकीस येत असुन सदर घटनेत जीनींग मधे ठेवलेला सात हजार क्विंटल कापूस अंदाजे किंमत चार कोटी व चार क्विंटल सरकी किंमत दिड कोटी व इतर असे सात कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

*घटनेची माहिती केळवद पोलीस स्टेशन चे ठाणेदार दिलीप ठाकुर यांना मीळताच त्यांनी आपल्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेत सावनेर नगर पालीका व खापा नगर पालीकेच्या अग्निशमन दलांना सदर सुचना देत त्यांचे व्दारे आगीवर नियंत्रण मिळवील्याने कोणत्याही प्रकारची जिवीत हानी टाळली.तसेच आग लागण्याचे कारण काय..?आगीत कीती नुकसान झाले…?आदिंची माहिती तपासणी अंती उघडकीस येणार असल्याची माहीती आमच्या स्थानिक प्रतिनिधीला भ्रमनध्वनी व्दारे दीली*

*जीनींग मधील अग्निशमन यंत्रे अथवा इतर उपाययोजना संशयास्पद*

*विजयलक्ष्मी जीनींग मधील सदर अग्नीकांड मुळे अनेक निरुत्तर प्रश्न पुढे येऊ लागली आहेत.त्यात महत्त्वाचे म्हणजे बँटरीच्या एका छोट्याशा ठीणगीवर जीनींग व्यवस्थापन व तेथील कामगार, अधिकार्यांना नियंत्रण का मिळवता आले नाही, एका गंजीला लागलेली आग इतर गंज्या सोबतच सरकीच्या गंजी पर्यंत कशी पोहचली,प्रत्येक गंजीच्या बाजुला आकस्मिक रित्या आग लागल्यास ती विझविण्यासाठी पाणीची व इतर व्यवस्थेचा वेळीच उपयोग का करण्यात आला नाही,की आग लागण्यामागे इतर काही कारणे असावी या सारखे अनेक प्रश्नांची उत्तरे तपासातून निश्पन्नास येणे गरजेचे नाही का असा सवाल जनतेतून उठू लागले आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …