*कोरोना रोग प्रतिबंधक लसीकरणाला नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद*
*दररोज लसीकरणास लागतात रांगा*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि दिनेश चौरसिया
सावनेर ः शहरातील प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण केन्द्रावर कोवीड़ 19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच नागरिकांच्या शरिरात रोगप्रतिकारशक्ती वाढवूण कोरोना संसर्गची तिव्रता कमी करण्याच्या हेतूने केन्द्र व राज्य शासनाच्या दिशादर्शने संपूर्ण देशात लसिकरणाचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

*सावनेर येथेही सदर लसीकरणास नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मीळत असुन सद्यस्थितीत कोरना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत फ्रंटलाईन वर्करात महसूल अधिकारी, कर्मचारी, नगर प्रशासन अधिकारी, कर्मचारी, आरोग्य अधिकारी कर्मचारी, आरोग्य सेवीका, डॉक्टर,आशा वर्कर,पोलीस विभाग आदिंच्या पहिल्या चरणाचे लसीकरण पुर्णत्वास आले असुन शासनाच्या दिशानिर्देशानुसार आणा 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 वर्षावरील विशेष आजारग्रस्तांना पहिल्या चरणाचे लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु असुन आज.दि.3 मार्च रोजी जवळपास 175 महिला पुरुष नागरिकांना लसीकरण करण्यात आले*
*याप्रसंगी प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण केन्द्र सावनेर चे कोवीड़ 19 प्रभारी डॉ. प्रितम निचट व डॉ संदिप गुजर यांच्याशी आमचे स्थानिक प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्यानी सांगितले की फ्रंटलाईन वर्करांचे प्रथम चरणाचे लसीकरण जवळपास झाले असुन आजवर जवळपास 2400 लोकांना लसीकरण करण्यात आले आहे.लसीकरणाबाबत नागरिकांत कमालीची उत्सुकता असुन ते स्वयःफुर्तीने लसीकरण केन्द्रावर पोहचुन आपल्या नावाची नोंदणी करूण दिलेल्या वेळेवर येऊण लसीकरण करवून घेत आहे आज जवळपास175 नागरिकांना लसीकरण करण्यात आले हे याचे उदाहरण आहे व याकरिता प्रसारमाध्यमे व पत्रकार बांधवांचे मोठे सहकार्य आम्हास लाभत असल्याचा व ते या संसर्गजन्य परिस्थितीत ही प्रशासनाच्या कांध्याला कांधा देऊण अभिनंदनास्पद कार्य करत आहेत असे मत व्यक्त केले*
*याप्रसंगी प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण केन्द्राचे कोवीड़ 19 प्रभारी डॉ. प्रितम निचट,डॉ. संदीप गुजर,डॉ. जयस्वाल मँडम, आरोग्य सेवक धनराज देवके,यशवंत अत्रे,घनश्याम तुर्के,औषध निर्माता श्रीमती मंजुषा भगतवार, आरोग्य सेवीका श्रीमती प्रतिभा लांजेवार इत्यादी प्रामुख्याने उपस्थित राहुन लसीकरणाचे कार्य योग्यरित्या हाताळत आहेत*
Maharashtra News Media सच की आवाज