Breaking News

*महाशिवरात्री दिना निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे फल वितरण*

*महाशिवरात्री दिना निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे फल वितरण*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – महाशिवरात्री दिना निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे शिव हनुमान मंदीर गांधी चौक कन्हान येथे नागरिकांना फल वितरण करून महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला.
गुरूवार दिनांक ११ मार्च ला शिव पंचायत हनुमान मंदिर गांधी चौक कन्हान येथे महाशिवरात्री निमित्य कन्हान शहर विकास मंच पदाधिकारी द्वारे शिव पार्वती मुर्तीचे पुजन करून नागरिकांना फळ वितरण करून महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, महा सचिव संजय रंगारी, हरीओम प्रकाश नारायण, प्रकाश कुर्वे, प्रविण माने, सोनु खोब्रागडे, अखिलेश मेश्राम, सुषमा मस्के, पौर्णिमा दुबे सह मंच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …