Breaking News

*छत्रपती शिक्षण संस्थेत यशवंतराव चव्हाण जयंती साजरी*

*छत्रपती शिक्षण संस्थेत यशवंतराव चव्हाण जयंती साजरी*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

नागपुर:- छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालय नागपूर विभाग यशवंतराव चव्हाण मुक्त महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या विद्यमाने यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका केंद्रप्रमुख सौ लता वाघ यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला उदबोधित करताना केंद्रप्रमुख सौ लता वाघ यांनी मुक्त विद्यापीठ शिक्षण गंगोत्री चे जनक यशवंतराव चव्हाण यांनी दूर शिक्षणाच्या माध्यमातून तळागाळातील असो किंवा शिक्षणापासून वंचित असलेल्याना शिक्षणाची आवड ठेवण्याकरिता शैक्षणिक वसा चालविण्याचे महान कार्य केले. या महामानवाची जयंती साजरी करणे अर्थात शिक्षण आपल्याला घरोघरी पोहोचविणे हाच उद्देश जोपासायचा आहे असे सांगितले. कार्यक्रमाला सर्व समंत्रक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन समंत्रक सुवर्णा जांभूळकर तर आभार प्रदर्शन केंद्र सहाय्यक दिपक खवले यांनी केले.कार्यक्रम covid-19 च्या नियमाने पार पडला.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …