*कन्हान शहरात विविध संघटने द्वारे जागतिक महिला दिवस थाटात साजरा*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहरात विविध संघटने द्वारे ठिक – ठिकाणी जागतिक महिला दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन जागतिक महिला दिवस थाटात साजरा करण्यात आला .
*जिजाऊ ब्रिगेड कन्हान*
कन्हान : – जागतिक महिला दिवस निमित्य जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान च्या वतीने गणेश नगर कन्हान येथे कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करून महिलांचे विविध विकासात्मक कार्यक्रमाने जागतिक महिला दिन थाटात साजरा करण्यात आला.
सोमवार दिनांक ८ मार्च ला सायंकाळी ४ वाजता गणेश नगर कन्हान येथे जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करुन राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेवर कार्यक्रमाचे अध्यक्ष विशाखा ठमके यांचा शुभहस्ते व प्रमुख अतिथी शोभा अहिर, वाटकर काकु यांचा उपस्थिति मध्ये पुष्प हार माल्यार्पण करुन विन्रम अभिवादन करीत कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेड कन्हान च्या अध्यक्षा माया इंगोले यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातुन महिला स्वालंबीकरण , सबलीकरण, स्वयंरोजगार निर्मिती या विषया वरील विविध कार्यक्रमाची माहिती स्पष्ट करून महिलांनी विविध कला कौशल्य, कार्यक्रम सादर करण्यास प्रोत्साहित केले. प्रमुख अतिथी व कार्यक्रमाच्या अध्यक्षा विशाखा ठमके यांनी महिला दिनाचे औचित्य साधुन महत्वपुर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन विद्या रहाटे यांनी केले तर आभार सुषमा बांते यांनी मानले . कार्यक्रत छायाताई नाईक, रंजनाताई इंगोले, लताताई जळते, पुष्पा चिखले, सुनिता ईखार, मनिषा पारधी, शितल बांते, कविता खैरकार, अनिता पाजुर्णे, बेबीताई ठाकरे, गोदावरी नागरे, मनिषा धुडस, सुनिता खैरकार, मिनल मडगे, किरण अनकर, अनिता चकोले, लता लुंढेरे, श्रीखंडे गि-हे सह अनेक महिलांनी उपस्थित राहुन जागतिक महिला दिवस थाटात साजरा करण्यात आला .

*संजय सत्येकार मित्र परिवार , कन्हान*
कन्हान – जागतिक महिला दिवस निमित्य दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा संजय सत्येकार मित्र परिवार द्वारे स्थानीय परिसरा मध्ये कार्यरत महिलांचा सम्मान करण्यात आला . कोरोना चा संकटात स्वताचे जीवन टाकुण आपल्या जीवनाची फिकर न करीत विविध क्षेत्रा मध्ये कार्यरत महिलांचे संजय सत्येकार मित्र परिवार द्वारे सम्मानित करण्यात आले असुन कोरोना च्या काळात आपले दिवस – रात्र सेवा करणारे स्वास्थ कर्मचारी , आशा वर्कर , महिला पोलीस कर्मचारी , व महिला किसान यांना फुल , वृक्ष व मिठाई देऊन सम्मानित करुन जागतिक महिला दिवस थाटात साजरा करण्यात आला . या प्रसंगी संजय सत्येकार , राजु दुनेदार , राजु गुधडे , शैलेश ढोरे , शंकर इवनाते , अरुणा जगनेकर , सह आदि नागरिक उपस्थित होते .
*धनगर समाज, सत्यशोधक महिला एकता परिषद व्दारे जागतिक महिला दिवस थाटात साजरा साजरा*
कन्हान : – धनगर समाज महिला एकता परिषद व सत्यशोधक महिला परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वाठोडा येथे जागतिक महिला दिवस निमित्य विविध कार्यक्रमासह थाटात साजरा करण्यात आला. सोमवार दिनांक ८ मार्च ला धनगर समाज महिला एकता परिषद व सत्यशोधक महिला परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वाठोडा येथे जागतिक महिला दिवस छाया कुरूटकर यांचा अध्यक्षेखाली विविध कार्यक्रमासह सावित्रीबाई फुलें च्या जीवनावर एकपात्री नाटक शोभाताई डहाके नी सादर केले. छाया कुरूटकर यांनी अध्यक्षीय भाषणातुन राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाई आंबेडकर सह आदी महिला शक्ती महिमा विषयी महिलांना मौलाचे मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन छाया वासनिक यांनी केले तर आभार शोभा डहाके यांनी व्यकत केले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रेखा बीरे , सविता नासरे , मंगला बावनकर , वर्षा तिजारे , शकुंतला वांढरे , प्रमिला खानोरकर , प्रमिला ढवळे , ढेंगेताई , रुक्मिणी भोस्कर , मोना बिलोरे , खुशी हातझाडे , वंदना करमरकर , अनिता तांदुळकर , रजनी अग्रवाल , संगीता बिल्लोरे सह आदी महिलांनी सहकार्य केले.
*पुष्पक टाईपिंग इन्स्टिट्यूट , कन्हान*
कन्हान – पुष्पक टाईपिंग कन्हान इन्स्टिट्यूट द्वारे जागतिक महिला दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . यावेळी सामाजिक व शैक्षणिक कार्य करणारी शिक्षिका श्रीमती विद्या पानतावणे मैडम यांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . तसेच केक कापुन जागतिक महिला दिवस थाटात साजरा करण्यात आला . या प्रसंगी रिना भुरे, प्राची वंजारी, सविता सहारे, माधुरी बोरकर, अश्विनी सावरकर, निकिता बागडे, रोषनी मेश्राम, श्रीजा ताई, प्रीयाताई, सुजाता ताई, गणेश पानतावणे, निखिल बागडे, मयुर बोरकर, सुरज मेश्राम सह आदि उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज