*कन्हान परिसरात शासनाच्या नियमाचे पालन करुन महाशिवरात्री उत्सव साजरा*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – दरवर्षी महाशिवरात्री हा उत्सव “हर हर महादेव , बम बम भोले” च्या गजरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो . परंतु यंदा कोरोना चा प्रादुर्भाव असल्यामुळे लक्षात घेत शासनाच्या नियमाचे पालन करुन महाशिवरात्री हा उत्सव कन्हान शहरात शांततेत साजरा करण्यात आला .
पारशिवनी तालुक्यातील जुनी कामठी येथे असलेल्या कामठेश्वर शिवमंदीर येथे ३५० वर्षापासुन सतत यात्रेचे व मेलेचे आयोजन करुन महाशिवरात्री साजरी करण्यात येते परंतु यावेळी कोरोना चा रोग असल्यामुळे यात्रा व मेलेचे आयोजन रद्द करण्यात आले असुन मंदिर कमेटी द्वारे बुधवार मध्यरात्री पासुन गुरुवार च्या पहाटे पंचद्रवांनी स्नान करून अभिषेक व आरती केली .
दरवर्षी नागरिक लाखोंच्या संख्येत या मंदिरा येत असुन यंदा कोरोना चा प्रादुर्भाव असल्यामुळे गुरूवार च्या सकाळ पासुनच नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली नाही . तरीपण नागरिकांनी मंदिरात येऊन शिव पिंडी वर बेलपत्ती , पुष्प वाहुन पुजा अर्चना केली . यावेळी नागरिकांनी मास्क सेनिटाइजर व सोशल डिस्टेन्स चे पालन करुन तसेच प्रसाद वाटप करुन महाशिवरात्री उत्सव शांततेत साजरा करण्यात आला . या प्रसंगी पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .

*महाशिवरात्री पिपरी च्या शिवभक्तानी केली साजरी*
कन्हान : – कन्हान – पिपरी प्रभाग क्रं ६ येथील पौराणिक शिव मंदीरात कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करित शिव पुजा अर्चना सह महाशिवरात्री पिपरी च्या शिव भक्त नागरिकांनी साजरी केली.
कन्हान नदीकाठावरील पिपरी प्रभाग क्रं ६ येथे पौराणिक शिव मंदीरात दरवर्षी प्रमाणे महाशिवरात्री निमीत्य शिव मंदीरातील मुर्तीस्वरूप शिवज्योतिर्लिंंग पिंडाची विधिवत पुजन जेष्ठ नागरिक क्रिष्णाजी मसा र, धनराज भोयर, चिरकुट रामगुंडे, बलीराम पहाडे ह्या च्या हस्ते पुष्पगुच्छ, पुष्पहार अर्पण करून पुजन केले. पिपरी येथील भजन गाणाऱ्या मंडळींनी महाशिवरात्री पर्वावर भजन गायन करून आरती करीत रवाप्रसाद (कढई), बुंदी, आलुभात, कढी अल्पोहार प्रसाद वाटप करून महाशिवरात्री कार्यक्रम अल्पवेळात समारोप करण्यात आला. कार्यक्रमास शिवशंकर भोयर, प्रशांत बाजीराव मसार, क्रिष्णा गांवडे, मनोहर कुवामनोरे, प्रल्हाद पहाडे, दिलीप रामगुंडे, कार्तिक कुथे, देवा मेश्राम, सुधाकर मसराम, चंद्रभान चौधरी, अजाबराव कड नायके, मोरेश्वर तिडके, धनराज उरकुडे, रामु कावळे, अभिषेक आकरे, संजय गुडधे, मुन्ना नान्हे, संदीप भोस्कर, शुभम खांडेकर, शुभम मरसकोल्हे, क्रिश वानखेडे आदीं शिवभक्तांनी अथक परीश्रम घेतले.
Maharashtra News Media सच की आवाज