Breaking News

*न.प.अभ्यंकर प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन निमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी माता पालकांना बक्षिस वितरण करण्यात आले*

*न.प.अभ्यंकर प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन निमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी माता पालकांना बक्षिस वितरण करण्यात आले*

सावनेर प्रतिनिधि – दिनेश चौरासिया
सावनेर – जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शाळेत माता पालकांसाठी रांगोळी स्पर्धा,क्राफ्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्यात पुरस्कार प्राप्त माता आणि कोरोना काळात स्वत:चे घर सांभाळून मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष ठेवून वारंवार शिक्षकांच्या संपर्कात राहणा-या आदर्श माता यांचा सत्कार करण्यात आला.यात रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक दुर्गा सक्रोते दुसरा क्रमांक अरुणा भिंगारे तर तिसरा क्रमांक कल्पना ढवळे यांचा आला तर आदर्श माता म्हणून दुर्गा कामोने,रुपा चौधरी, सविता पटे,सलमानीशा शेख,कल्पना ढवळे,पुनम लाड,नीशा बसवार,कुमरे आजी ,दुर्गा अलोनकर ,किरण वासनिक यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनिता गणेश झाडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.आशा कराळे, जेष्ठ शिक्षक श्री.सुरेश गजभे सर, कु.ज्योती कोडापे मॅडम सौ.नर्मदा डवरे मॅडम,कु.दिप्ती खोब्रागडे मॅडम उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन श्री.नरेंद्र चापरे सर यांनी तर आभारप्रदर्शन श्री.माणिक रामटेके सर यांनी केले.कोरोना परिस्थिती विचारात घेता सोशल डिस्टस्टिंग आणि सॅनिटायझरींग करण्यात आले होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …