Breaking News

*कांद्री येथे कोरोना रूग्णाला शालिनीताई बर्वे ने केली मदत*

*कांद्री येथे कोरोना रूग्णाला शालिनीताई बर्वे ने केली मदत*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कांन्द्री (कन्हान) – कांन्द्री – कन्हान परिसरात कोरोना रुग्णांची संख्या अति वेगाने वाढत आहे .कांन्द्री वार्ड नंबर १
शिव मंदिर जवळ येथे राहणार्या
सुशील भलावी यांचे पूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्या आईचा उपचार मेयो रुग्णालय नागपूर येथे सुरू आहे.आणि त्यांच्या कुटुंबांना घरीच कॉरंनटाईन करण्यात आले आहे .अश्या गंभीर परिस्थिती मध्ये सुशील भलावी त्यांची
पत्नी गरोदर असून शासना कडून व कांन्द्री ग्रामपंचायत कडून कोणत्याही प्रकार चे अन्नधान्याची मदत मिळत नसल्याने सुशील भलावी यांनी लिलाधर बर्वे यांना फोन करून आपल्या घरची परिस्थिती सांगीतली असता लिलाधर बर्वे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी पुढाकार घेऊन पंधरा दिवसाच्या राशन व इतर सामग्री सौ.शालिनीताई लिलाधर बर्वे यांनी सर्वांच्या उपस्थितीत मदत करण्यात आले आणि कांन्द्री तील नागरिकांना एक मदतीच्या संदेश हि दिला आहे .

या प्रसंगी महेंद्रबाबू पलिये , प्रशांत देशमुख ,विष्णू सरोदे ,आकाश कापसे ,उत्कर्ष बारापात्रे ,राजेश चिखलकर ,रितेश मेश्राम ,मंन्दा कनोजे ,उज्वला पोटभरे , मनिषा वाडीभस्मे ,अनिता कापसे ,आशा खळतकर ,कल्यानी बेलेकर , कुसरामताई इत्यादि उपस्थिति होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …