Breaking News

*काटोल येथे कोविड रूग्णालय सुरू करण्याची जेष्ठ नागरीक मंडळ काटोल द्वारा मागणी*

*काटोल येथे कोविड रूग्णालय सुरू करण्याची जेष्ठ नागरीक मंडळ काटोल द्वारा मागणी*

विशेष प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे
काटोल – शहर येथे कोविड रूग्णालय सुरू करण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मा जिल्हाधिकारी नागपुर यांना जेष्ठ नागरीक मंडळ काटोल द्वारा निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मा. जिल्हाधिकारी नागपुर यांना प्रस्ताव सादर करण्यात येईल असे सूतोवाच श्रीकांत उबंरकर उपविभागीय अधिकारी काटोल यांनी केले.

काटोल ची लोकसंख्या जवळपास 52,000 आहे सध्या कोविड-19 ची दुसरी लाट आलेली असुन काटोल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोविड-19 चे रुग्ण वाढत आहे. या गंभीर रूग्णांना नागपुर येथे उपचारासाठी पाठविले जाते. नागपुर येथे शासकीय रुग्णालयात रुग्णांना अॅडमीट करून न घेतल्यास खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागतो. यावर साधारणतः 2 ते 3 लाख रुपये खर्च येतो. हा खर्च सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेर आहे. तेव्हा काटोल येथे कोविड रूग्णालय सुरू करून सर्वसामान्य जनतेसाठी उपचाराची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी जेष्ठ नागरीक मंडळ काटोल कडुन निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी जेष्ठ नागरीक मंडळ काटोल चे अध्यक्ष श्री वामनराव खंडाळ, सचिव श्री गजाननराव भोयर ,सहसचिव श्री अशोकराव काकडे व सदस्य सर्वश्री रमेश तिजारे, भीमराव ढोले, मोतीराम वंजारी, पंजाबराव दुधाने उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …