*प्लाझा डोनेशन कँम्प संपन्न*

*आयएमआय सावनेर चे यशस्वी आयोजन*

*बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय धोटे व आयएमएचे अध्यक्ष डॉ निलेश कुंभारे यांचे हस्ते शुभारंभ*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि दिनेश चौरासिया
सावनेर ःदिनांक २१ मार्च रविवार रोजी आय एम ए सावनेर शाखा तर्फे तीव्र कोविंड असलेल्या रुग्णांकरिता प्लाजमा डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आला या कार्यक्रमा प्रसंगी इंडियन अकॅडमी ऑफ इडिया पिडियाट्रिक्स नागपूर शाखेचे अध्यक्ष श्री विजयजी घोटे यांनी या प्लाजमा डोनेशन कॅम्प चे उद्घाटन केले. गंभीर कोविंड रुग्णांना या प्लाजमा डोनेशन चा नक्कीच फायदा होईल असे मत अध्यक्ष डॉक्टर निलेश कुंभारे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार डॉक्टर प्रवीण चव्हाण होते .कार्यक्रमाप्रसंगी पदाधिकारी उपाध्यक्ष डॉक्टर अशिष चांडक कोषाध्यक्ष डॉक्टर शिवम पुण्यानी, सचिव डॉक्टर परेश झोपे, सहसचिव डॉक्टर विलास मानकर उपस्थित होते. आय एम ए सावनेर शाखेचे सदस्य डॉक्टर विजय धोटे डॉक्टर शिवम पुण्यानी, डॉक्टर अमित बाहेती डॉक्टर नितीन पोटोडे, डॉक्टर संदीप गुजर, उपस्थित होते. याप्रसंगी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन’चे सदस्य डॉक्टर छत्रपती मानापुरे व होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉक्टर राहूल दाते उपस्थित होते.

कोविंड प्लाजमा दान शिबीर इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेर येथे जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले प्लाजमा घेण्याचे काम जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर चे ट्रान्सफ्युजन ऑफिसर डॉक्टर अभिजीत मानकर व श्री किशोर खोब्रागडे यांनी पाहिले.

सावनेरातील डॉक्टरांमध्ये डॉ. परेश झोपे ,डॉ निलेश कुंभारे व डॉ अमित बाहेती यांनी प्लाजमा दान केले.
याप्रसंगी प्रत्येक प्लाजमा दात्याला प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार व अभिवादन करण्यात आले.
या शिबिरात 10 प्लाजमा दात्यांनी प्लाजमा दान केले.
Maharashtra News Media सच की आवाज