*महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.*
*भाजप कन्हान शहर पारशिवनी तालुका पदाधिकार्यांची मागणी.*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने मुंबईतील डांस बार रेस्टारेंट कडुन १०० कोटी खडणी वसुल करित असल्याचा आरोप केल्याने अनिल देशमुख व परमबीरसिंग यांची सखोल चौकसी केंद्रीय एजंसी मार्फत करण्यात यावी आणि अनिल देशमुख यांनी तात्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी भाजपा कन्हान शहर व पारशिवनी तालुका पदाधिकारी द्वारे करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचावर केलेल्या १०० कोटींचा खंडणीचा आरोप केला असुन आता पर्यंत महाराष्ट्रचा राजकारणातील लज्जा स्पद गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्य करते पोलीस प्रशासन च्या मदतीने डांस बार, रेस्टोरेंट यांच्या कडून खड़नी वसूल करीत आहे. या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व परमबीर सिंग यांची सखोल चौकसी केंद्रीय एजंसी मार्फत करण्यात यावी. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काल राजीनामा द्यावा. अशी मांगणी कन्हान शहर व पारशिवनी तालुका भाजपा पदाधिकारी द्वारे तारसा रोड चौक कन्हान येथे नारे देऊन करण्यात आली आहे .
या प्रसंगी जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते वेंकटेश कारेमोरे, भाजप तालुका अध्यक्ष अतुल हजारे, कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक, तालुका अनुसुचित.जाती अध्यक्ष लीलाधर बर्वे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष शालिनी बर्वे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष सरिता लसुंते, नगरसेविका संगीता खोब्रागडे, सुषमा चोपकर, अनिता पाटिल, सुषमा मस्के, कामेश्वर शर्मा,शहर महामंत्री सुनील लाडेकर, राजेन्द्र शेंदरे, मनोज कुरडकर, अजय लोंढे, अमिष रुंघे, शैलेश शेळके, सौरभ पोटभरे, भरत सालवे, रिंकेश चवरे, धर्मेंद्र गणवीर, गुरूदेव चकोले, संजय रंगारी, मयूर माटे, लोकेश आंबाडकर, राजुभाऊ पाटिल, बालकृष्ण वाड़ीभस्मे, अद्रीराम कनोजिया सह मोठ्या संख्येत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज