Breaking News

*वाळू संदर्भात न्यायालयात याचीका लवकरच* *अनेक मोठे मासे गळाला लागणार*

*वाळू संदर्भात न्यायालयात याचीका लवकरच*


*अनेक मोठे मासे गळाला लागणार*

विशेष प्रतिनिधि वर्धा

वर्धा – काही भ्रष्ट अधिकार्यांच्या मदतीने वर्धा जिल्यात वाळू माफियाने वर्धा जिल्यात हैदोस घातला आहे. करोडो रुपये खर्चून रेतीचे घाट घेऊन जिल्यातील अनेक नदी नाल्यांना टार्गेट केले आहे.


*आज जिल्ह्यातील नदीलगत शेती जमिनीत धसत असून वर्धा, वना आणी अनेक नदी नाले नामशेष होत आहे. पर्यावरणाला मोठा धोका उत्पन्न होत असतांना अधिकारी पैशाच्या जोरावर गप्प बसतो. ही वस्तुस्थिती असून यावर उपाय केवळ न्यायालय हाच अंतिम उपाय मानून या संदर्भात बुधवारी काही पर्यावरण प्रेमी एकत्र येऊन एक याचिका दाखल करून रेती उत्खन करतांना नदीत पाँकलेन मशीन. आणी पंप न वापरता रेतीचा उपसा आणी भरणा करत आहेत जे वाळू काढण्या करिता पाँकलेन मशीन आणी पंप वापरतांना पकडला जाइल त्यांचेवर कठोर कारवाई केली जावी तसेच अवैध रित्या उपसा करण्यास बंदीघालावी असे याचिकेतून नमूदकेले जाणार आहे तसेच हा नियम संपूर्ण राज्यभर लावावा जानेकरून पर्यावरणस धोका निर्माण होणार नाही आणी नदीचे अस्तित्व धोक्यात येणार नाही हा या याचिकेचा मुख्य उदेष असणार आहे.हल्ली काही अधिकारी या गोरखधंद्यात लिप्त असून अज्ञात मार्गाने पैसे कमविण्या करिता पदाचा गैरफायदा घेत असून सतत रेती माफियांच्या संपर्कात असतात यातील काही अधिकारी महत्वपूर्ण अधिकारी या मार्गाने गेले याची तत्काळ सूचना फोनकरून देताच नदीतील संपूर्ण साहित्य गायब केले जाते.याचा मोठा मोबदला दिला जातो.

यासंदर्भात काही अधिकारी यांचे मोबाईल क्रमांकाचे संपूर्ण विवरण काढून यात जबाबदार अधिकारी कर्मचारी यांचेवर कार्वायीची मागणीही या याचिकेतून केली जाणार आहे. काहींनी शासन रक्कम न भारताच रेतीचा उपसा केला यांचेवर चोरीचे मामले दाखल करावेत तसेच यात संबंधित तहसीलदार यांना जबादार धरुन निलंबनाची कारवाई करावी असी मागणी सुद्धा केली जाणार आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …