*अवैधरीत्या मोहाफुल गावठी दारु बाळगणाऱ्या आरोपीतांविरुद्ध कार्यवाही*
*एकूण 2.67,000 रूपयाचा माल जप्त*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः दि. 24/03/2021 रोजी केळवद पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की , मौजा नांदागोमुख शिवार फाटा येथे काही इसम गावठी मोहाफुल हातभट्टीची दारू गाळण्याचा अवैधरीत्या व विनापरवाना व्यवसाय करीत आहे . अशा मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केळवद पोलीसांनी दिनांक 24/03/2021 चे 08.00 वा . मौजा नांदागोमुख शिवारातील युवराज उद्धराव मोवाडे रा . नांदागोमुख यांचे शेतात लागुन असलेल्या झुडपीमध्ये जंगलात आरोपी नामे क . 1 ) दिलीप संतोष राजपुत , 2 ) अमित चंद्रपाल राजपुत , 3 ) दिनेश दिलीप राजपुत व 4 ) कामीनी अमित राजपुत सर्व रा . पारधी बेडा तिडंगी हे मोहाफुल हातभट्टी लावुन दारू गाळतांना दिसले . पोलिसांना पाहुन चारही आरोपी जंगालाच्या दिशेने पळुन गेले त्यांचा पाठलाग केला असता मिळुन आले नाही .*
*घटनास्थळावरून ताब्यातुन 2600 लिटर मोहाफुल रसायन सडवा आणि 200 लिटर मोहाफुल हातभट्टीची गावठी दारू व साहित्य असा एकुण 2,67,000 / – रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . सदर प्रकरणी पोलीस स्टेशन केळवद येथे आरोपीतांविरुध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले असुन आरोपीतांचा शोध घेणे सुरू असून गुन्हयाचा पुढील तपास पोहवा रामराव पवार 7875983360 हे करीत आहे . सदरची कार्यवाही ही नागपुर ( ग्रामिण ) पोलीस अधिक्षक श्री . राकेश ओला , अपर पोलीस अधिक्षक श्री राहुल माकणीकर , उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर विभाग श्री . अशोक सरंबळकर यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक श्री दिलीप ठाकुर , पोउपनी अर्जुन राठोड , सफौ अरूण गुंठे , अमरदिप कामठे , पोहवा रविन्द्र चटप , पोशि धोंडुतात्या देवकते , श्रीधर कुलकर्णी , मनापोशि अश्विनी निकोसे , चालक पोशि गुणवंता डाखोळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे .
Maharashtra News Media सच की आवाज