Breaking News

*केंन्द्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात चक्काजाम* *मंत्री सुनील केदार यांनी केन्द्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर घेतला खरपूस समाचार*

*केंन्द्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात चक्काजाम*

*मंत्री सुनील केदार यांनी केन्द्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर घेतला खरपूस समाचार*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेरः केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण व शेतकरी विरोधी काळया कायद्याच्या विरोधात शुक्रवार दि.26-3-2021 ला सावनेर येथे गांधी चौक येथे मा. सुनीलभाऊ केदार कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्तिथित जिल्ह्याचे काँग्रेस पक्ष अध्यक्ष राजेंद्र मुळक,जेष्ठ काँग्रेस नेते नाना गावंडे,नागपुर जिल्हापरिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे आदिंच्या उपस्थितीत गांधी चौक येथे सकाळी 12.00 वा चक्का जाम आंदोलन व धरणा प्रदर्शन करण्यात आला याप्रसंगी सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य सर्व ग्राम पंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य तसेच नगर परिषद सदस्य सर्व काँग्रेस युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या चक्का जाम आंदोलनात उपस्थित राहुन आप आपले विचार मांडले.

याप्रसंगी बोलताना राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केंन्द्रातील मोदी सरकारला निष्ठूर व निर्दयी सरकार असुन यांना फक्त अडानी आणी अंबानी दिसतात गोरगरीब कष्टकरी शेतकरी नाही,हे बड्या लोकांचे सरकार आहे.मोठमोठ्या उद्योगपतींना हजारो कोटीचे कर्ज माफ करू शकतात परंतू शेतकऱ्यांना त्यांचे हक्काची किंमत मात्र मागील तीन महिन्यापासून मीळत नाही दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे व मरत आहे तरीही या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीचे काळीज पाझरत नाही. कु्षीप्रधान देशात बळीराज्याचा बळी जात आहे परंतू मा.पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये प्रचार करत म्हणत आहे “खेला होबो”…*

मी राज्याचा मंत्री होण्या आधी एक शेतकरी आहे मी साहेबांना सांगु इच्छीतो की मोदी साहेब “खेला तो होबे….और बहोत जल्दी होबे…,देशका कीसान को आपका खेला समझ गया अब आनेवाले दिनोमे आपका और आपकी भारतीय जनता पार्टीका खेला निश्चित होबे*.


*असे कनखर विचार मांडत केंन्द्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा खरपुस समाचार घेतला*

*याप्रसंगी शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष पवन जैस्वाल,सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश खंगारे,व्यापारी संघाचे सचिव मनोज बसवार,सा.पं.स. सभापति अरुणाताई शिंदे, उपसभापति प्रकाश पराते, कृ उ बा स सभापति गुनवंत चौधरी,सा.ता.काँग्रेस अध्यक्ष सतीश लेकुरवाळे,खरेदी विक्री अध्यक्ष दिलीप बनसिंगे,युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहुल सीरिया,उपाध्यक्ष अमोल केने, रामभाऊ उमाटे,पस.सदस्य गोविंदा ठाकरे,नगरसेवक सुनील चापेकर, निलेश पटे,दीपक बसवार,अश्विन कारोकार,चंदु कामदार, सोनु रावसाहेब,चंदु बनसिंगे, स्वपनिल महाजन, राहुल ढ़ोंगड़े,प्रा.साहेबराव विरखरे, गणेश काकड़े, अजय महाजन, महावीर कमाले,मुकेश इंगोले, रूपेश कमाले, अशोक कुम्भलकर,विनीत पाटिल, मासूम संभे, देवानंद ठाकुर, गोपाल घटे,डोमासाव सावजी, शफीक सैय्यद, सादिक शेख,विष्णु कोकडे,अनिल ठाकुर,दिलावर शेख, राहुल ढ़ोंगड़े,विनीत केने, मोहन कमाले, मोनु नकाशे, दिगंबर गजभिये,सुरेश केने, सोनू देशमुख, अनिल कोल्हे, सौरभ साबडे, आदी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते*

*आयोजनाची सांगता दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनात प्राणाची आहुती देणार्या शेतकर्यांना दोन मीनिट मौन पाळून श्रध्दांजली वाहून करण्यात आली हे विशेष…*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …