Breaking News

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूरातील श्री महाकाली मंदिर परिसर विकासासाठी 60 कोटी रू. निधी मंजुर

*पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूरातील श्री महाकाली मंदिर परिसर विकासासाठी 60 कोटी रू. निधी मंजुर*

*आ. नानाजी शामकुळे यांच्‍या प्रयत्‍नांना यश*

आवारपूर:- गौतम धोटे
  *चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री तथा अर्थमंत्री यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर महानगरातील श्री महाकाली मंदिर परिसराचा विकास करण्‍यासाठी 59 कोटी 95 लक्ष 25 हजार रू. इतक्‍या रकमेच्‍या कामास प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली आहे. शासनाच्‍या नगरविकास विभागाने दि. 19 सप्‍टेंबर 2019 रोजी याबाबतचा शासननिर्णय निर्गमित केला आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. नानाजी शामकुळे यांनी केलेल्‍या प्रयत्‍नांना यश प्राप्‍त झाले आहे.*
*चंद्रपूर शहरातील श्री महाकाली मंदिर परिसराचा विकास टप्‍पा क्र. 1 अंतर्गत धर्मशाळा बांधकाम, स्‍वच्‍छता गृहे, दुकाने व मुख्‍य प्रवेशद्वाराच्‍या बांधकामासाठी हा निधी मंजुर करण्‍यात आला आहे. महानगरपालिकांना मुलभुत सोयी सुविधांचा विकास करण्‍याच्‍या कामांसाठी देण्‍यात येणा-या अनुदानाअंतर्गत हा 60 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्‍यात आला आहे.*
*श्री महाकाली मंदिर परिसराच्‍या विकासासाठी नागरिकांच्‍या सुचना जाणुन घेण्‍याकरीता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाकाली मंदिर विकास परिषदेचे आयो‍जन चंद्रपूरच्‍या प्रियदर्शिनी नाटयगृहात केले होते. त्‍यानंतर सदर मंदिर परिसराच्‍या विकासासाठी निधी मंजुर व्‍हावा यासाठी आ. नानाजी शामकुळे यांनी सातत्‍याने पाठपुरावा केला. सदर पाठपुराव्‍याला यश प्राप्‍त झाले असुन अर्थमंत्री तथा पालकमंत्री यांच्‍या पुढाकाराने 60 कोटी रू. निधी मंजुर करण्‍यात आला आहे.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …