Breaking News

*नरखेड तालुक्यात सरकारी मालमत्तेचे अवैधरित्या उत्खनन* *शासनाच्या नियमाचे उल्लंघन ,शासन साखर झोपेत* *उत्खननातून निघालेल्या संपत्तीचे अवैधरित्या वाहतूक*

*नरखेड तालुक्यात सरकारी मालमत्तेचे अवैधरित्या उत्खनन*

*शासनाच्या नियमाचे उल्लंघन ,शासन साखर झोपेत*


*उत्खननातून निघालेल्या संपत्तीचे अवैधरित्या वाहतूक*

 

विशेष प्रतिनिधि -निलेश बनाईत

नरखेड – कान्होलकर ,अँकर:-नरखेड तालुक्यात असंख्य स्टोन क्रेशर असुन त्यांना शासनाने आखलेल्या नियमावलीनुसार उत्खनन करण्याची मुबा आहे परंतु नियमावलीचे पालन न करता अवैधरित्या उत्खनन करणे चालू आहे व त्यातून निघालेल्या संपत्तीची अवैधरित्या वाहतूक होत आहे त्यामुळे रस्त्याची दुर्दशा,अपघाताचे प्रमाण वाढले आहे तसेच क्रेशरच्या धुळीमुळे आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान होत आहे यावर शासनाचे दुर्लक्ष आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या सर्व गोष्टीची शाहनिषा करून तात्काळ क्रेशर बंद करून अवैधरित्या होणारे उत्खनन थांबवण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना केली आहे त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागपूर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष श्री.नरेशजी भोयर ,तालुका सचिव साजिद पठाण,विध्यार्थी सेना तालुका अध्यक्ष रितेश कान्होलकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते .*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …