*आशा वर्करांच्या आमरण उपोषणाला मिळाले यश*

*आठ दिवसात आशा वकॅर गट प्रवतॅकाची बदली करणार अन्यथा देणार पदाच्या राजीनामा – जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
पारशिवनी – मागील अनेक दिवसापासुन दहेगाव प्राथमिक आरोगय केंन्द्रातील गट प्रवर्तक शिल्पा बांगडकर आशा वर्करांना मानसिक रित्या त्रास देत असल्याने आशा वर्करांनी नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री नितिन राऊत , जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी , आरोग्य सभापती , उपाध्यक्ष मनोहर कुंभारे व इतर संबंधित अधिकार्यांना एक निवेदन देऊन गट प्रवर्तक शिल्पा बांगडकर यांना हटविण्याची मागणी केल्यावर ही संबंधित अधिकार्यांनी गट प्रवर्तक शिल्पा बांगडकर यांचा विरुद्ध कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याने येथील आशा वर्करांनी सोमवार दिनांक 22 मार्च ला काम बद आंदोलन केले असुन संबंधित अधिकार्यांनी या गंभीर विषया कडे दुर्लक्ष केल्याने बुधवार 24 मार्च ला आशा वर्करांनी पारशिवनी बाजार चौक येथे एकत्र येऊन आमरण उपोशन सुरु केले होते. कोरोना काळात आशा वर्कर या महत्वपुर्ण असल्याने जिल्हा परिषद अध्यक्षा सौ . रश्मिताई बर्वे यांनी आशा वर्करांचा या गंभीर विषया कडे लक्ष केंन्द्रीत करून गुरवार दिनांक २५ मार्च ला पारशिवनी येथे आशा वर्करांचा आमरण उपोषन स्थळी भेट देऊन उपोशन कर्ता महिलांच्या विषयांची दखल घेत वादग्रस्त गट प्रवर्तक शिल्पा बांगडकर यांची प्राथमिक आरोग्य केंन्द्र दहेगाव येथुन तात्काळ बदली करण्यात येईल असे लेखी आशवासन दिले . जर दहा दिवसात येथील गट प्रवर्तक शिल्पा बांगडकर यांची बदली नाही झाली तर मी आपल्या अध्यक्ष पदाच्या राजीनामा देईल असे उपोषण स्थळी जाहीर केले . त्यामुळे आशा वर्करांनी आपले आमरण उपोशन मागे घेऊन आपल्या पुर्वरत कामावर रजु होण्यची आंदोलन कारी आशा वर्करांना विनंती केली. कोरोना चा काळ असल्याने आशा वर्करांनी आमरण उपोशनावर बसु नये .आपल्या तक्रारीची दखल घेणयात आली असुन पुढील दहा दिवसात गट प्रवर्तक शिल्पा बांगडकर यांची बदली करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिलयाने उपोशन कर्ता महिलांचे सुरु असलेले आमरण उपोशन निंबु पाणी पाजुन मागे घेण्यात आले..या वेळी तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना भोयर, पंचायत समिति सभापती मीना कावळे, पंचायत समिति उपसभापती चेतन देशमुख. श्रीधर झाडे, पारशिवनी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संतोष वैरागडै, समाजसेविका निता इटनकर, गट विकास अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थीत होते.

येथील वादग्रस्त गट प्रवर्तक शिल्पा बांगडकर यांची बदली पुढील दहा दिवसात करण्यात येइल . अन्यथा मी आपलया पदांच्या राजीनामा देईल असे रश्मी बर्वे यांनी उपोषण स्थळी जाहीर केले. उपोशन स्थळी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी आशा वर्करांना लेखी आश्वासनं दिलयाने येथील आशा वर्करांनी आपले उपोशन मागे घेत पुर्वरत कामावर रंजु होणार असल्याचे मान्य करीत आमरण उपोशन मागे घेतले.तसेच आशा वर्करांना सुरक्षा साधना च्या पुरवठा का करण्यात आला नाही या बाबत तात्काळ चौकशी करण्याचे आदेश तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत वाघ यांना जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी दिले.
आशा वर्करांना कोरोना काळात सुरक्षा साधने मिळाली नसल्याची तक्रार उपोशन कर्ता आशा वर्करांनी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांचा समोर मांडली असता कोरोणा काळात आशा वर्करांना सुरक्षा साधने पुरविल्याची नोंद कागदपत्रे दिसुन आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ प्रशांत वाघ यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना सांगीतले. पण वास्तवात सुरक्षा साधने आशा वर्करांना मिळालीच नाही. तरी ही सुरक्षा साधने पुरविल्या गेल्याची नोंद कार्यालयात कशी असा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशाशनात व संबंधित अधिकार्यांन मध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे ? या बाबत जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी तात्काळ आशा वर्करांना सुरक्षा साधने पुरविण्याचे आदेश तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत वाघ यांना दिले आहे . तसेच आलेले सुरक्षा साधने आशा वर्करांना पुरविली का व का पुरविण्यात आलेले नाही . या बाबत चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देणयात आले. व दोषी वर कारवाई करणयाचे निर्देश देण्यात आले आहे .
Maharashtra News Media सच की आवाज