*दिलेल्या वचनाची पुर्ताता केल्याने बोरगावात आनंदोत्सव*
*राज्याचे मंत्री सुनील केदारांच्या हस्ते दुर्गा मंदिराचे भुमीपुजन*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर – सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील बोरगाव बु.येथे दि २६ मार्च ला दुपारी 12-00 वाजताच्या दरम्यान दुर्गा माता मंदिर चे भूमिपूजन सोहळा मा.पशुसंवर्धन, दुग्धविकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते नागपुर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मा.राजेन्द्र मुळक,वरिष्ठ काँग्रेस नेते नाना गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

मीळालेल्या माहीती नुसार बोरगाव बु.येथील दुर्गा माता मंदिर निर्माण करण्यासाठी गावातील महिला मंडळींनी पुढाकार घेत मंदिर निर्माण केले होते परंतु यात गावचे राजकारण आडवे आले व सत्ताधारी मंडळींनी सदर मंदिर अवैध रित्या बांधल्याचा ठपका ठेवत सदर मंदिराचे बांधकाम शासकीय हस्तक्षेप व पोलीसांच्या बंदोबस्तात पाडण्यात आल्यामुळे गावातील वातावरण दुषीत होऊ घातले होते.अश्यात तत्कालीन आमदार व सध्याचे राज्यातील मंत्री सुनील केदार यांनी गावकर्यांची समजुत घालत लवकरच भव्य दुर्गा मातेच्या मंदिर निर्माण करण्याचे आश्वासनच नव्हे तर गावकर्यांना वचन दिले होते.त्या वचनाची आज पुर्तता होत असल्याचे बघुन अनेक गावकऱ्यांना “बोले तैसा चाले,त्याची वंदावी पाऊले” चा भास घेत दिलेल्या वचनाला मुर्तरुप देणारे व्यक्तिमत्त्व मा. सुनील केदार यांचे आभार मानत आनंदोत्सव साजरा केला.
याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती वैभव भाऊ घोंगे,कळमेश्वर पंचायत समिती सभापती श्रवणदादा भिंगारे व धापेवाडा जिल्हा परिषद सदस्य महेंद्र भाऊ डोंगरे,जिल्हा काँग्रेस चे राजेंद्र जिचकार तसेच काँग्रेस पक्षाचे नेते व गावकरी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज