*होळी , धुलिवंदन , व रंगपंचमी सण शासनाच्या नियमाचे पालन करुन साधेपणाने साजरा करावा.*

*कन्हान – पिपरी नगरपरिषद , कन्हान पोलीस , व आरोग्य विभाग प्रशासनाचे नागरिकांना आव्हान*
कन्हान प्रतिनिधी – ऋषभ बावनकर
कन्हान – नागपुर जिल्ह्यात व कन्हान शहरात , परिसरात कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असल्याने शासनाच्या नियमाचे पालन करुन होळी , धुलिवंदन व रंगपंचमी सण साधेपणाने साजरा करावा असे आव्हान कन्हान – पिपरी नगरपरिषद , कन्हान पोलीस , व आरोग्य विभाग प्रशासनाने नागरिकांना केले आहे .

कन्हान शहरात व परिसरात होळी, धुलिवंदन व रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असुन दरवर्षी या सणात एकमेकांवर रंग टाकुन , गुलाल लावुन , पाणी टाकुन , रंगाची उधळण करण्यात येत असते . परंतु या वर्षी कन्हान शहरात व परिसरात कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असल्यामुळे कोरोना चा फैलाव थांबविण्याकरिता शासनाच्या व पुनर्वसन , आरोग्य , पर्यावरण , वैद्यकीय शिक्षण विभाग , संबंधित महानगरपालिका , पोलीस प्रशासन , स्थानिक प्रशासन , यांनी विहित केलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे .तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याचा मधल्या कालावधीत अजुन काही सुचना प्रसिद्ध झाल्यास त्याचे देखील पालन करावे . असे आव्हान कन्हान – पिपरी नगरपरिषद , कन्हान पोलीस , व आरोग्य विभाग प्रशासनाने नागरिकांना केले आहे .
Maharashtra News Media सच की आवाज