Breaking News

*कन्हान येथे संत तुकाराम महाराज बीज साजरी*

*कन्हान येथे संत तुकाराम महाराज बीज साजरी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरातील संत तुकाराम नगर येथे संत तुकाराम महाराज यांची बीज कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करित छोटेखानी कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.


मंगळवार दिनांक.३० मार्च ला संत तुकाराम नगर कन्हान येथील संत तुकाराम महाराज मंदीरात संत तुकाराम महिला भजन मंडळा द्वारे मंदीरातील संत तुकाराम महाराज व सर्व मुर्तीस पुष्पहार माल्यार्पण करून छोटेखानी कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली असुन भजन, आरती व दहीकाला प्रसाद वितरण करण्यात आला. मराठा सेवा संघ कन्हान द्वारे शांताराम जळते, ताराचंद निंबाळकर, मोतीराम रहाटे, सुनिता ईखार यांनी संत तुकाराम महाराजांच्या मुर्तीस पुष्पहार माल्यार्पण करून संत तुकाराम महाराजांचा जय घोष करित अभिवादन करून कोरोना नियमाचे पालन करित संत तुकाराम महाराज बीज साजरी केली. कार्यक्रमास प्रमिला मते, लक्ष्मी गडे, पुष्पा खर्चे, लता मोंडे, लता मेहेर, डोणारकर काकु, रेवतकर काकु आदि ने सहकार्य केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …