Breaking News

*मातोश्री वु्ध्दाश्रमात संपन्न “रंगोत्सव”* *शेकडो आश्रम वासीयोंनी अनुभवला पारिवारीक आभास..* *पतंजलि योग समिती सावनेर तालुका व मातोश्री वु्ध्दाश्रम व्यस्थापनाचे छोटेखानी आयोजन…*

*मातोश्री वु्ध्दाश्रमात संपन्न “रंगोत्सव”*

*शेकडो आश्रम वासीयोंनी अनुभवला पारिवारीक आभास..*

*पतंजलि योग समिती सावनेर तालुका व मातोश्री वु्ध्दाश्रम व्यस्थापनाचे छोटेखानी आयोजन…*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि दिनेश चौरासिया

सावनेर – पतंजलि योग समीती सावनेर व मातोश्री वुध्दश्रम सोनपुर आदासा यांच्या संयुक्त विद्देमानाने दरवर्षी मातोश्री वु्ध्दाश्रम सोनपुर आदासा येथे रंगाचा सण होळीच्या पावन पर्वावर तीन दिवसीय योग उत्सवाचे आयोजन करण्यात येत होते व सदर आयोजनात पतंजलि जिल्हा समितीचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पोलीस अधिकारी, पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत रंगोत्सव साजरा केला जात असे परंतु सध्यास्थीतीत दुसर्या चरणाच्या वाढत्या कोरोना मुळे सदर आयोजन रध्द करण्यात आले.

*परंतू वुध्दाश्रमात वास्तव्यास असणाऱ्या वयोवृद्धांना कीतीही केले तरी मोठ्या सणच्या वेळी परिवाराच्या आठवणी व पुलका येणे अपेक्षितच असते अश्यात एकीकडे वाढते कोरोनाचे सावट तर दुसरीकडे दरवर्षी होणार्या आयोजनाची गोडी अश्यात मातोश्री वुध्दाश्रमाचे व्यवस्थापक कर्मचारी व पतंजलि सावनेर चे पाच कार्यकर्ते यांनी छोटेखानी स्तरावर रंगोत्सवाचे आयोजन करुण वयोवृद्धांना मायेची ऊब देण्याच प्रयत्न करण्यात आले*

*रंगोत्सव*

*दि.29 मार्च 2021 ला “धुलीवंदन” च्या पावन पर्वावर सावनेर तहसील चे प्रभारी मातोश्री वुध्दाश्रमाचे व्यवस्थापक व वु्ध्द आश्रम वासी पदाधिकारी, योग शिक्षक,सहयोग शिक्षक शेकडोच्या संख्येत उपस्थित राहून आयोजनाचा लाभ घेत असे परंतु वाढत्या कोरोनाचे संक्रमण तसेच पीतातुल्य वयोवृद्धांना याची लागन होऊ नये तसेच या आयोजनास खंड पुडू नये म्हणून पतंजलि योग समीतीचे तालुका प्रभारी यांचे नेतृत्वात पाच लोकांनी मातोश्री वुध्दाश्रम पोहचुन वयोवृद्धांना गुलाल लावून आशिर्वाद घेत त्यांच्या चेहर्यावर हसु फुलवत पारंपरिक आयोजनाचा आभास दीला.

*या रंग उत्सवाच्या विषेश आयोजनाच्या सफलतार्थ पतंजलि युवा भारतचे तालुका सावनेर चे प्रभारी राजु काळबांडे,विनोद काळे,आशा ढुंढेले,शुभम ढवळे,परिश्रम घेतले , मातोश्री वु्ध्दाश्रमाचे व्यवस्थापक प्रदीप चंदनबटवे तसेच कर्मचारींनी या भव्य आयोजनास यशस्वी करण्या करीता व उपस्थित सर्व मान्यवरांच्या जलपानाची उचीत व्यवस्था करण्यात आली..

*मातोश्री वुध्दाश्रम येथे आयोजित या पारिवारिक “रंगोत्सवात भेट देऊन वुध्दाश्रम वासीयांचे उत्साहवर्धन करूण रंग गुलाल लावून आशीर्वाद प्राप्त केला*

*याप्रसंगी सावनेर तालुका मीडिया टीमनी उपस्थित राहून सर्वांना उत्साहीत केले यात प्रमुखतेनी दिनेश चौरसीया,शभम ढवळे आदी प्रमुखतेनी उपस्थित राहून रंगोत्सवाचा आनंद लुटला…*

*कार्यक्रमचे संचालन पतंजलि योग समिती तालुका सावनेर च्या प्रभारी लताताई ढवळे यांनी तर प्रास्ताविक मातोश्री वुद्धाश्रमाचे व व्यवस्थापक प्रदिप चंदनबटने यांनी व श्री सावध मानले*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …