Breaking News

*भर वस्तीत खाजगी कोविड सेंटर उघडायला नागरिकांचा विरोध* *जुन्या जर्जर अवस्थेतील वास्तुत खाजगी कोवीड़ सेंटर उघडून नगरवासीयांचा जीव धोक्यात टाकून पैसा लाटन्याचा नगरसेविका स्वाती कामडी यांचा आरोप*

*भर वस्तीत खाजगी कोविड सेंटर उघडायला नागरिकांचा विरोध*

*जुन्या जर्जर अवस्थेतील वास्तुत खाजगी कोवीड़ सेंटर उघडून नगरवासीयांचा जीव धोक्यात टाकून पैसा लाटन्याचा नगरसेविका स्वाती कामडी यांचा आरोप*

सावनेर प्रतिनिधि – दिनेश चौरासिया

सावनेरः सावनेर नगरपालिका हद्दीतील नागपुर सावनेर मार्गावरील वार्ड क्र.4 दर्श बार जवळील एका जर्जर अवस्थेतील खाजगी इमारतीत नव्याने खाजगी कोवीड़ सेंटर उघडण्यासाठी शहरातील काही डाँक्टर प्रयत्न चालवत आसल्याची माहिती नगरवासीयांच्या निदर्शनास येताच त्यांनी नगरसेविका स्वाती कामडी यांना सदर विषयाची माहीती देत विरोध नोंदवली असता नगरसेवीका यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सदर ठीकाणी कोवीड़ सेंटरला परवानगी नाकारावी अश्या विनंतीचे निवेदन मा.जिल्हाधिकारी साहेब नागपुर, मा उपविभागीय अधिकारी सावनेर तसेच तहसीलदार सावनेर यांना सादर करुण न्याय मागीतला आहे.


अनेक महिला पुरुष नागरिकांच्या उपस्थितीत सादर करण्यात आलेल्या निवेदनातून त्यांनी म्हटले आहे की सदर इमारत ही जवळपास 50 वर्ष जुनी वस्तू असुन एकदम जीर्ण अवस्थेत सदर इमारतीच्या परिसरात नगर पालीकेच्या ड्रेनेज लाईन ची व्यवस्था नसल्याने परिसरात नेहमी मोरीतील घाण पाण्याचे डबके साचलेले असतात त्यामुळे आधिच डासांचा हौदसापासुन अनेक साथीच्या आजाराची भीती असते अश्यात सदर इमारतीत कोवीड़ सेंटर ला परवानगी दिल्याल्या तेथे कोवीड़ विषाणूजन्य परिस्थिती निर्माण होईल व सदर इमारतीत योग्य स्वरूपात शौचालय,अग्निशमन, तसेच इतर उपाययोजना नसुन सदर इमारतीची अधीक भार सोसन्याची क्षमता नाही असे असल्यामूळे व सोबत रहवासी क्षेत्र असल्यामुळे व सावनेर शहरात दररोज शेकडो कोरोना रुग्ण आढळत असल्याने हदर ठीकाणी कोवीड़ सेंटर उघडल्यास प्रभागात कोवीड़ रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे व सदर इमारतीत जे डॉक्टर संयुक्त रीत्या कोवीड़ सेंटर उघडू इच्छित आहे त्यांचेच स्वतांचे दोन दोन चार चार मजलीचे प्रशस्त दवाखाने आहेत मग त्यांनी आपल्या स्वताच्या रुग्णालयातच कोवीड़ सेंटर का उघडू नये असा सवाल ही उपस्थित केला*

*सदर इमारतीची व सर्व बाबींची चौकशी करू*

*शहर नव्याने सुरू होत असलेल्या कोवीड़ सेंटरला परवानगी नाकारण्याच्या विषयावर उपविभागीय अधिकारी यांनी निवेदनकर्त्यांचे मत जाणून घेत म्हटले की शहरात दररोज वाढत्या रुग्णांची संख्या बघता शहरात नव्याने एक नाही तर अनेक कोवीड़ सेंटर ची गरज आहे परंतु त्याकाळी कोठेही कोवीड़ सेंटर उघडण्यासाठी परवानगी मीळेल असे नही सदर इमारतीची योग्य तपासणी व निरिक्षण मुख्याधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी आदिंच्या माध्यामातून करून ती वास्तू योग्य असेल तरच परवानगी देण्यात येईल अन्यथा नाही असे निवेदनकर्त्यांना आश्वासीत करत त्यांची समजूत घालवली.

*तर निवेदनकर्त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना कोवीड़ सेंटर उघडू पाहणाऱ्या डॉक्टरांना सेवा करावयची नसुन पैसा कमवायचां आहे.येथे सावनेर शहरातील रुग्णांना प्राथमिकता न देता जवळील मध्यप्रदेशातील लोकांचा उपचारासाठी ही व्यवस्था केल्या जात असल्याचा आरोप केला.

*तसे बघीतले तर दुसऱ्या चरणात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संसर्गावर आळा बसवीण्या करिता प्रशासन पुर्णपणे नाकाम ठरत आहे तर या संधिचे सोनं करु पाहणार्यांची कमतरता नाही.अश्यात मा.जिल्हाधिकारी, मा.उपविभागीय अधिकारी साहेब काय निर्णय घेतात यावर निवेदनकर्त्यांसह नगरवासीयांचे लक्ष वेधले आहे*

*याप्रसंगी गंगाधर ठाकरे,ज्ञानेश्वर गमे,कविता भारती,निळकंठ खुबाळकर,शेषराव कडू,जितेंद्र ठाकरे,नामदेव गायकवाड, सचिन टेकाडे,जोगेंद्र कापसे,सौ.प्रेमलता घोरसे,सौ.निलीमा बोरकर,कविता गजभिये, अशोक ठाकरे,पदमा भुते,प्रमीला खोडनकय,बेबी भीसे,विमल मोरे,उज्वला मंडपे,प्रमीला कोल्हे,दिक्षा भंडारे,सोनु ढेंगळे सह प्रभागातील अनेक महिला पुरुष उपस्थित होते*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …