*होळीच्या सायंकाळी कोरोना पॉझेटिव्ह पेशेंट ने केले महिलेवेर हल्ला*

मुख्य संपादक- किशोर ढूंढेले
सावनेर – कोरोना पॉझेटिव्ह असून होळीच्या शिल्लक कारणावरून रामदास शंकर घुगल याने शिविगाळ करत दगडाने माझ्या डोक्यावर हल्ला चढविल्याची घटना उघडकीस आली.

*होळीच्या दिवस असल्यामुळे फीर्यादी आपल्या अंगणात होळीचे लाकडे लावत होते. तेथेच बाजूला राहणारा इसम रामदास घुगल घरातून शिविगाळ करीत होता व तो कोरोना पाँझेटिव्ह असुन होम कॉरन्टाईन असतांना सुध्दा रोडवर येवून फीर्यादीवर दगडाने प्राणघातक हल्ला केला व त्यात फीर्यादी ला डोक्यावर दगडाने मारले व त्यात ती गंभीर जखमी झाली व अपंग असल्यामुळे खाली जमिनीवर पडून तडफडू लागली .*
*गंभीर जखमी फीर्यादी ला तातडीने प्राथमिक आरोग्य केन्द्रावर उपचार करुन नागपूर येथे मेडीकल ला हलविण्यात आले . होम कॉरन्टाईन असणारा व्यक्ती हा रस्त्यावर येवून मारपिट करणे हे कितपत योग्य आहे तसेच, एक अपंग महिला शिक्षिका आहे .व तो धमकी देत होता की पूर्ण परिवारात कोरोना रोग पसरविणे हे मा.जिल्हाधिकारी यांच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसत आहे . करिता सदर व्यक्तीवर उच्च कार्यवाही व्हावी अशी मागणी फीर्यादी ने आपल्या तक्रारीतून करण्यात आली*
*तसेच होम कॉरन्टाईन असणाऱ्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारे सरकारी यंत्रणाची कुणाचाही देखरेख नाही . त्यामुही नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ही बाब अंत्यंत गंभीर असुन एका अपंग शिक्षिका व हा प्राणघातक हल्ला एक शरमेची बाब आहे .यावरून सावनेर शहरात पोलीसांचा व नव्याने रुजू झालेल्या ठाणेदारांचे कीती वचक आहे हे सीध्द होत आहे. एक अपंग महिलेवर अमानुष पणे हल्ला चढविणार्यावर योग्य कार्यवाही व्हावी अशी मागणी पीडीत दीव्यांग व आप्त परिवारातुन होत आहे.*
Maharashtra News Media सच की आवाज