Breaking News

*कन्हान शहरात व परिसरात लाॅकडाऊन चे नियम तात्काळ कडक करण्याची मागणी* *कन्हान – पिपरी शहर व परिसर रेड झोन मध्ये जाण्याची दाट शक्यता वाढली* *कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांचे नप मुख्याधिकार्यांना निवेदन*

*कन्हान शहरात व परिसरात लाॅकडाऊन चे नियम तात्काळ कडक करण्याची मागणी*

 

*कन्हान – पिपरी शहर व परिसर रेड झोन मध्ये जाण्याची दाट शक्यता वाढली*

 

*कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांचे नप मुख्याधिकार्यांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान – पिपरी शहरात व परिसरात मागील काही दिवसान पासुन कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असुन सुद्धा कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासन कोरोना चा फैलाव थांबविण्याकरिता कुठल्याही प्रकारची उपाय योजना करीत नसल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच उपाध्यक्ष रुषभ बावनकर यांचा नेतृत्वात कन्हान – पिपरी नगरपरिषद चे मुख्यधिकारी गिरीश बन्नोरे यांना भेटुन व या कोरोना विषयावर चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन कन्हान – पिपरी शहरात व परिसरात लाॅकडाऊन चे नियम तात्काळ कडक करण्याची मागणी केली आहे .

निवेदनात सांगितले कि कन्हान – पिपरी शहरात व परिसरात मागील काही दिवसान पासुन कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असुन सुद्धा कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासना द्वारे कन्हान शहरा मध्ये व परिसरात कोरोना चा फैलाव थांबविण्याकरिता कुठल्याही प्रकारची कडक उपाय योजना करतांना दिसत नसल्याने कन्हान शहर व परिसर रेड झोन मध्ये जाण्याची दाट शक्यता वाढली आहे . कन्हान शहरातल्या बाजार पेठेत कोरोना च्या नियमाचे काटेकोरपणे पालन करतांना दिसत नसुन , नागरिक बिना कामा ने बाहेर पडत आहे , तसेच मास्क , सेनिटाइजर व सोशल डिस्टेन्सं चे पालन न करीत असल्याने कन्हान शहरात व परिसरात कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असुन किती तरी लोक बळी पडत असुन मृत्यु दरांची संख्या अति वेगाने वाढत आहे . तसेच कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासना च्या दुर्लक्षा मुळे कन्हान शहरात व परिसरात आढळुन आलेले कोरोना पाॅजीटिव रुग्ण शहरात , परिसरात व नगरा मध्ये फिरत असुन सुद्धा नगर परिषद प्रशासन या कडे दुर्लक्ष करीत आहे . कन्हान शहर पासुन काही अंतरावर असलेल्या वराडा गावात कोरोना चा विस्फोट झाल्याने वराडा गाव रेड झोन घोषित करुन गाव सील करण्यात आले आहे . कन्हान – पिपरी शहरात व परिसरात कोरोना चा फैलाव थांबविण्याकरिता संपुर्ण शहरात सेनिटाइजर ची फवारणी करणे अत्यंत गरजेचे झाले असुन शहरातल्या बाजार पेठेत कोरोना च्या नियमाचे काटेकोरपणे पालन न करणार्यांवर तसेच मास्क , सेनिटाइजर व सोशल डिस्टेन्स चे पालन न करणार्यांवर दंडात्मक कारवाई करुन कन्हान शहरात व परिसरात कोरोना चा फैलाव थांबविण्याकरिता तात्काळ कडक उपाय योजना करुन कन्हान शहरात व परिसरात लाॅकडाऊन चे नियम तात्काळ कडक करण्याची मागणी कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच उपाध्यक्ष रुषभ बावनकर यांचा नेतृत्वात कन्हान – पिपरी नगरपरिषद चे मुख्यधिकारी गिरीश बन्नोरे यांना भेटुन व कोरोना चा विषयावर चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन करण्यात आली आहे .

या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , प्रवीण माने , रविंन्द्रर सांकला , शाहरुख खान , अमित भारत्वाज ,अमोल साकोरे , हर्ष पाटील , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …