*मोक्षधाम टेकाडी येथे तात्काळ दिवाबत्ती आणि हाथपंपाची व्यवस्था करण्याची मागणी*

*युवा मित्र सामाजिक संघटन चे सचिव सतीश घारड यांचे टेकाडी ग्रामपंचायत च्या संरपंचा ला निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
टेकाडी (कन्हान) : – कन्हान शहरापासुन काही अंतरावर असलेल्या टेकाडी गावात कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असुन मृत्युची संख्या देखील वेगाने वाढत आहे . परंतु टेकाडी ग्रामपंचायत द्वारे मोक्षधाम टेकाडी येथे दिवाबत्ती व हाथपंपाची व्यवस्था न केल्याने नागरिकांचा अडचणी वाढल्या आहे . हे लक्षात घेत युवा मित्र सामाजिक संघटन चे सचिव सतीश घारड यांनी टेकाडी ग्रामपंचायत च्या संरपंचा सौ.सुनिता मेश्राम यांना एक निवेदन देऊन मोक्षधाम टेकाडी येथे दिवाबत्ती व हाथपंपाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे .निवेदनात सांगितले कि राज्यासह संपुर्ण नागपुर जिल्ह्यात कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असुन टेकाडी गावात देखील कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असुन मृत्युची संख्या देखील वाढतीवर आहे . ज्यात कोरोना बाधित व इतर आजाराने झालेल्या मृतकांचा देखील समावेश आहे . सध्या गावात कोणत्याही आजाराचा मृत्यु झाल्यास कोरोना च्या भीती पोटी कुणी ही अधिक वेळ न लावता तात्काळ मृतदेहांवर अंत्यविधि करतात . मग रात्री उशिरा का होईना सध्या तरी नाईलाजास्तव शोकाकुल कुटुंबियांना रात्रीच अंत्यविधि पार पाडावा लागतो . अश्यात मात्र समशान भुमीत विजेची व पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना अनेक समस्येला जावे लागते .

महोदय ग्रामपंचायत प्रशासन म्हणुन आपल्यावर गावातील जिवंत आणि मृत अश्या सर्वांना कुठलीही हालअपेष्ठा न करता समान न्याय देण्याची गरज आहे . मात्र अस दिसुन येत नसल्याने युवा मित्र सामाजिक संघटन चे सचिव सतीश घारड यांनी टेकाडी ग्रामपंचायत च्या संरपंचा सौ.सुनिता मेश्राम यांना एक निवेदन देऊन तात्काळ मोक्षधाम टेकाडी येथे दिवाबत्ती व हाथपंपाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे . अन्यथा तीव्र आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे .
Maharashtra News Media सच की आवाज