Breaking News

*कोणत्याही क्षणी राज्यात लॉकडाउनच्या घोषणेची शक्यता?* *प्रशासनास सज्ज राहण्याच्या सुचना* *मी लॉकडाउनचा इशारा देतोय- मुख्यमंत्री*

कोणत्याही क्षणी राज्यात लॉकडाउनच्या घोषणेची शक्यता?

*प्रशासनास सज्ज राहण्याच्या सुचना*

*मी लॉकडाउनचा इशारा देतोय- मुख्यमंत्री*

विशेष प्रतिनिधि
मुंबई – राज्यात दुसर्या चरणात सुरु असलेल्या करोनाचा उद्रेक वाढत असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ही स्थीती बघता राज्याला सध्या लॉकडाउनशिवाय पर्याय नसल्याचे राज्य सरकारचे मत असुन आता राज्यात सरकार केव्हाही लॉकडाउन घोषित करू शकते, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे.*

*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतांना लॉकडाउन जाहीर केला नसला, तरी देखील लॉकडाउनबाबतचे संकेत दिले होते. त्यावेळी राज्यातील करोनाच्या परिस्थितीवर बोलत असताना त्यांनी प्रखरतेनी मत व्यक्त करत म्हटले की मी राज्याला पूर्ण लॉकडाउनचा इशारा देतो असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. या वाढत्या करोनाला रोखायचे कसे याबाबत तज्ज्ञांशी बोलून लवकरच निर्णय घेणार असेही मुख्यमंत्री म्हणाले होते.*

*त्यानंतर राज्याला सध्या लॉकडाउनशिवाय पर्याय नसल्याचे सरकारचे मत बनले असून आता सरकार केव्हाही लॉकडाउन घोषित करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रशासनानेही त्या दृष्टीने हालचाली करण्यास सुरू केल्याचे सूत्र असुन कालच्या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना राज्यात लॉकडाउन विरोधी पक्षांसह अनेक घटक राज्यात लॉकडाउन नको असे म्हणत आहेत. मात्र करोनाला रोखायचे कसे याबाबत कोणीच मार्ग सांगत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आरोग्यसुविधांचा आढावा देखील घेतला होता.*

*मागील वर्षभराच्या कालावधीत राज्य सरकारने आरोग्यसुविधा वाढवल्या आहेत. टेस्टिंग सेंटर्स, बेड, रुग्णालये, ऑक्सिजनचा पुरवठा अशा सर्व सुविधा सरकारने वाढवल्या आहेत. अशा सुविधा आणखीही वाढवता येतील आणि आपण त्या वाढवू देखील. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात पुरे पडतील इतक्या संख्येने डॉक्टर्स आणि नर्सेसची व्यवस्था इतक्या लवकर होणार कशी असा सवाल ही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला आहे. या प्रश्नातून त्यांनी आता लॉकडाउनला पर्याय नसल्याचेच संकेत दिसु लागले आहे.*

मी लॉकडाउनचा इशारा देतोय- मुख्यमंत्री

*राज्याचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी राज्यात आज लॉकडाउन जाहीर करत नसलो तरी लॉकडाउनचा आज इशारा देत आहे, असे मुख्यमत्र्यांनी म्हटले होते. राज्यात संसाधने अपुरी पडू लागली असून जर करोना रुग्णवाढ अशीच कायम राहिली तर येत्या १० ते १५ दिवसांमध्ये रुग्णालयांमधील बेड्स आणि साधने अपुरी पडतील व अश्या परिस्थितीत कड़क लाँकडाऊन शिवाय पर्याय उरणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले होते.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …