Breaking News

*मंत्री सुनील केदार यांनी वाढत्या कोरोना संसर्गजन्य परिस्थिती वर घेतली आढावा बैढक* *सावनेर उपविभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना कोवीड़ 19 च्या दिशानिर्देशाचे काटोकर पणे पालन करुण युध्द स्तरावर उपाययोजना आखण्याचे दिशानिर्देश तर नागरिकांना सतर्कतेचे व लसीकरण करुण घेण्याची विनंती*

*मंत्री सुनील केदार यांनी वाढत्या कोरोना संसर्गजन्य परिस्थिती वर घेतली आढावा बैढक*

*सावनेर उपविभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना कोवीड़ 19 च्या दिशानिर्देशाचे काटोकर पणे पालन करुण युध्द स्तरावर उपाययोजना आखण्याचे दिशानिर्देश तर नागरिकांना सतर्कतेचे व लसीकरण करुण घेण्याची विनंती*

 

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि दिनेश चौरासिया

सावनेर – तहसील कार्यालयाच्या प्रांगणात राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील बाबू केदार यांनी मा.उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, सावनेर कळमेश्वर तालुक्याचे तहसीलदार, दोन्हीही तालुका पंचायत समीतीचे बीडीओ, वरिष्ठ अधिकारी, तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी, पोलीस स्टेशन चे ठाणेदार तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांची संयुक्तिक आढावा बैठक घेऊण या महामारीच्या रोकथाम करण्याकरिता सुरु असलेल्या उपाययोजना व अपेक्षित उपाययोजनांचा परिपूर्ण आढावा घेण्यात आला व सुरु सध्यास्थीतीत सुरु असलेल्या लसिकणाच्या कार्यास गती देण्याच्या सुचना याप्रसंगी देत या कार्यात कोणत्याही प्रकारची अडचन येत असल्यास प्रत्यक्ष त्या गोष्टी माझ्या लक्षात आणून द्यावी अशी विनंतीही उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या.

तर याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले की ही वेळ राजकारण करण्याची नसुन सर्वांना एकत्र येऊण या कोरोना रुपी संकटाला तोंड द्यायचे आहे.मागील एक वर्षापासून आपण या कोरोना महामारी शी दोन दोन हात करत आहोत परंतू हा सुरू असलेला एप्रिल व येणारा मे महिन्यातील पंधरवडा हा अत्यंत महत्त्वाचा भाग यात आपणास डोळ्यात तेल धालुन व आपणजे करत आहो त्यापुढेही एक पाऊल टाकून काम करारशयचे आहे तेव्हाच आपण या कोरोनाला थांबविण्यात यशस्वी होऊ व याकरिता मा.मुख्यमंत्री व संपूर्ण राज्य शासन पुर्ण ताकदीने लागले आहे.

नागरिकांतील लसीकरणाविषयीची गैरसमजुती दुर करुण त्यांना मोठ्या प्रमाणात लसिकरणाकरीता प्रवु्त्त करावे तसेच नागरिकांन सह सर्व आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका,ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या मोहीमेत शासकीय कर्मचाऱ्यांना मदत करावी असे आव्हान करत खापरखेडा परिसरातील दहेगाव येथील दहा खाटेच्या कोवीड़ सेंटर ला तातडीने परवानगी देत क्षेत्रातील माँयल व कोळसा खानीतील दवाखान्यात कोवीड़ सेंटर व त्यास लागणार्या आँक्सीजन व इतर व्यवस्था तातडीने करण्याच्या सुचना उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे व तालुका आरोग्य अधिकारी यांना दिल्या तसेच सावनेर कळमेश्वर परिसरातील खाजगी डॉक्टरांना ही या संकटकालीन परिस्थीत मदत करण्याची विनंती याप्रसंगी करण्यात आली.

याप्रसंगी जिल्हापरिषद नागपूर चे माजी उपसभापती मनोहर कुंभारे,जी.प.सदस्य ज्योती सीरसकर,पंचायत समिती सभापती अरुणाताई शींदे,उपसभापती प्रकाश पराते,आयएमएचे अध्यक्ष डॉ. निलेश कुंभारे, डॉ शिवम पुण्यानी प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …