*सोशल मीडियावर जातीय व्देष पसविणार्या वर योग्य कारवाई ची मागणी*
*पोलीसात तक्रार दाखल*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः सोशल मीडियावर विशेष जाती विषयक आक्षेपार्ह पोस्ट करुण तेड निर्माण केल्या विषयावर पोलीसात तक्रार दाखल करुण योग्य कारवाई ची मागणी करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे….महाराजांमुळे आपल्याला स्वराज्याचा नवीन सूर्य बघायला मिळाला. आपल्या भूमीवर आपले राज्य स्थापन झाले..मुळात स्वराज्य म्हणजे काय ? तर आपले राज्य..

शिवाजी महाराजांच्या या स्वराज्य यज्ञात अठरापगड जातीच्या लोकांनी खांद्याला खांदा लावून आपले प्राणांची सुद्धा आहुती दिली…राजे हे रयतेचे होते…शिवरायांच्या संपूर्ण इतिहासात छत्रपतींन्नी कधीही जातीवाद केल्याच आढळून आलेलं नाही. उलट ‘हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा’ असे म्हणून आपण उभे करत असलेले स्वराज्य हे माझे स्वतःचे नसून ईश्वर आपल्याकडून हे रयतेचे राज्य घडवून आणतोय असा उल्लेख आपल्याला कित्येक अज्ञापत्रातून दिसून येतो.
आणि अश्याच छत्रपतींच्या नावाचा उल्लेख करून ब्राम्हण समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे सावनेर पोलीस स्थानक येथे कपिल ढवंगाळे यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.

कपिल ढवंगाळे यानी दि ३/४/२०२१ रोजी व्हाट्सअप्प च्या स्टेटस वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य स्टेटस ठेवले ज्यात,‘विष देऊन संपविला चौमुलखाचा छत्रपती,भटांच्या हारामखोरीचे आणखी पुरावे देऊ किती!!गुडघी रोगाने मृत्यू झाल्याची नोंद इतिहासात कुठेही नाही,खोटा इतिहास सांगून गळा कापला या शेंडी धाऱ्यांनी..३ एप्रिल १६८०..छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन’ असे म्हंटले होते…अश्या प्रकारचे स्टेटस ठेवून आपण छत्रपती शिवाजी महाराजनच्या नावाखाली एखाद्या विशिष्ट जातीला टारगट शब्द लिहून टार्गेट करतोय असे म्हणायला हरकत नाही…अश्याने सावनेर सारख्या लहानश्या गावामध्ये ब्राम्हण समाजाबद्दल द्वेषाची भावना निर्माण होऊन गावात सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे..अश्या प्रकारच्या पोस्ट टाकल्याने ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली अश्या प्रकारचे घाणेरडे जातीवाचक विचार समाजामध्ये पेरले गेले तर त्यामुळे सामाजिक कलह व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे सोशल मीडियावर याप्रकारच्या पोस्ट तसेच सामाजिक अपभ्रम होऊ नये.

*करिता प्रथमेश देशपांडे यांनी दि.६/४/२०२१ रोजी सावनेर पोलीस स्टेशन येथे कपिल ढावंगळे यांच्याविरोधात तक्रार दाखल करुण न्याय मागीतला आहे*
Maharashtra News Media सच की आवाज