खापरखेडा औष्णिक विघुत केंन्द्राचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांनी जापानला जाणा-या एवेंजर्स गुणवत्ता मंडळाचे केले अभिनंदन

*खापरखेडा औष्णिक विघुत केंन्द्राचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांनी जापानला जाणा-या एवेंजर्स गुणवत्ता मंडळाचे केले अभिनंदन*


प्रतिनिधि -दिलीप येवले

खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र येथील कोळसा हाताळणी विभागातील “एवेंजर्स गुणवत्ता मंडळ” यांची टोकीयो जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मंडळ स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. ही स्पर्धा 23 ते 26 सप्टेंबर 2019 दरम्यान टोकीयो, जपान येथे होणार आहे. याआधी या गुणवत्ता मंडळाने डिसेंबर 2018 मध्ये ग्वालियर येथे झालेल्या गुणवत्ता मंडळ स्पर्धेत सरस कामगिरी करत अव्वल स्थान पटकावले होते. या मंडळाने वॅगन टिपलर येथील साईड आर्म चार्जर नामक यंत्रामध्ये बदल करून सिस्टीम ची उपलब्धता वाढवली. या मंडळाला खापरखेडा औष्णिक विज केंन्द्राचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे , उपमुख्य अभियंता राजेंद्र राऊत , उपमुख्य अभियंता शरद भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता देवगडे व उपकार्यकारी अभियंता धनंजय पुरी शशिकांत टाले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या “एवेंजर्स गुंवत्ता मंडळ ” मध्ये सागर इंगळे (फॅसीलीटेटर), महेश पुजारी (टीम लीडर), शैलेश मेश्राम ( डेप्युटी लीडर), सुनील चव्हाण (सदस्य ), अभयकुमार माथुरे (सदस्य), सागर कोल्हे (सदस्य) यांचा समावेश आहे.*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …