Breaking News

*वणी रस्त्याचे बांधकाम देत आहे अपघाताला निमंत्रण.* *रस्ता बांधकामासाठी टाकलेली राख हवेने उडून अपघात घडत आहेत.*

*वणी रस्त्याचे बांधकाम देत आहे अपघाताला निमंत्रण.*

*रस्ता बांधकामासाठी टाकलेली राख हवेने उडून अपघात घडत आहेत.*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा – वणी वरोरा रस्त्याचे बांधकाम मागिल एक वर्षा पासुन सुरु आहे, आणी रस्त्याची दुरावस्था व दुर्दशा फार मोठी अड़चन बनत आहे.

रस्त्यावर साइड ने जी राख टाकली गेली आहे, ती जिवघेनी ठरत आहे, ही राख उडून रस्त्यावर येत आहे व वाहन चालकाला समोर चे काही दिसत नाही, सदर रस्त्याचे बांधकाम अग्रवाल कम्पनी कड़े असुन अग्रवाल कंम्पनी ने सदर राख टाकतांना योग्य प्रकारे न पसरवता व त्यावर बरोबर पाण्याची फवारणी तसेच रोलर व्दारे उचित वजनाने न दाबल्यामुळे ती राख हलक्याश्या हवेत उडू लागते त्यामूळे वाहन चालकांना पुढील काही दिसत नसल्याने तसेच रस्त्यावर पडलेल्या राखीवरुण दुचाकी वाहन चालक घसरुण पडने नेहमीची बाब बनली आहे.


सदरहू रस्ता बांधकाम व रस्त्याच्या कडेवर पसरवीलेली राख ही तय मानकाप्रमाणे न पसरवता मनमानी प्रकार केल्याचा आरोप नागरिकांतून होत असुन सदर रस्ते बांधकामातील अनियमीता दुर करुण रहदारीला योग्य असा रस्ता उपलब्ध करुण द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …