*कन्हान पोलीसांनी बोरी (सिंगोरी) येथे अवैध रेती चोरीचा ट्रॅक्टर पकडला*
*आरोपी ला पकडुन ट्रॅक्टर, १ ब्रॉस रेती सह ६ लाख ४ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त.*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत बोरी (सिंगोरी) शिवारात कन्हान नदीची अवैध रेती चोरी करून ट्रॅकटर, ट्राली मध्ये भरून नेतांना कन्हान पोलीसांनी सापळा रचुन शिताफितीने पकडुन आरोपी च्या ताब्यातील ट्रॅक्टर,ट्रॉली व १ ब्रॉस रेती असा सहा लाख चार हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपी विरूध्द कारवाई करण्यात आली. प्राप्त झालेल्या माहिती नुसार कन्हान पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त माहिती मिळाली की, बोरी (सिंगोरी) कन्हान नदीची अवैद्य रित्या रेती चोरून नेत असल्याच्या गोपनिय
माहिती ची परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजित कुमार क्षीरसागर यांनी सहानिशा करून स्वत: व एपीआई सतिश मेश्राम, एपीआई अमित कुमार आत्राम, पोलीस ताफ्यासह रविवार दिनांक ११ ला सकाळी ९ ते १० वाजता च्या दरम्यान बोरी (सिंगोरी) शिवारात सापळा रचुन शिताफीतीने आरोपी सुभाष चांदवालुके हा ट्रॅक्टर, ट्रॉलीत अवैद्यरित्या कन्हान नदीची रेती चोरून वाहतुक करतांना मिळुन आल्याने एपीआई सतिश मेश्राम यांचे सरकारी फिर्यादी ने अपराध क्रमांक १०८ /२०२१ कलम ३७९, १०९ भादंवी नुसार आरोपी ट्रॅक्टर चालक सुभाष दामाजी चांदवालुके व ट्रॅक्टर मालक राहुल येरणे दोघे ही राहणार. बोरी (सिंगोरी) यांचा विरूध्द गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक एम एच ४० बी जी २४५६ किंमत ६ लाख रूपये, चोरीची १ ब्रॉस रेती किंमत ४ हजार रूपये असा एकुण ६ लाख ४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून ही कारवाई करण्यात आली.सदर कारवाई नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक राकेश ओला, पोलीस अपर अधिक्षक राहुल माकणीकर, पोलीस उपविभागीय अधिकारी कन्हान मुख्तार बागवान यांचे मार्गदर्शनात परिवेक्षाधिन पोलीस उप अधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर, एपीआई सतिश मेश्राम, एपीआई अमितकुमार आत्राम, नापोशि कुणाल पारधी, पोशि संजु बरोदिया, शरद गिते, सुधीर चव्हाण, कुणाल, जितेंद्र गावंडे सह आदि कन्हान पोलीस कर्मचार्यांनी ही कारवाई केली .
Maharashtra News Media सच की आवाज