Breaking News

*कन्हान शहरातल्या व्यापारी दुकानदारांना वेळ देऊन दुकाने सुरु करण्याची मागणी* *कन्हान – कांन्द्री दुकानदार महासंघाचे नप मुख्याधिकारी व कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षकांना निवेदन*

*कन्हान शहरातल्या व्यापारी दुकानदारांना वेळ देऊन दुकाने सुरु करण्याची मागणी*

*कन्हान – कांन्द्री दुकानदार महासंघाचे नप मुख्याधिकारी व कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षकांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे राज्य शासनाने नियमावली कठोर केली असुन गर्दी टाळण्याकरिता राज्यात कलम 144 लागु केल्याने स्थानिक प्रशासना द्वारे काही दिवसान पुर्वी कन्हान शहरातील दुकाने बंद करण्यात आल्याने शहरातील व्यापारी दुकानदारांनी याचा विरोध करुन कन्हान – पिपरी नगरपरिषद चे मुख्यधिकारी मा. गिरीश बन्नोरे व कन्हान पोलीस स्टेशन चे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान निरीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांना निवेदन देऊन कन्हान शहरातल्या व्यापारी दुकानदारांना वेळ देऊन दुकाने सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे .
निवेदनात सांगितले की , मागील एक वर्षापासुन देशासह राज्यात व कन्हान शहरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे राज्य शासनाने नियमावली कठोर केली असुन गर्दी टाळण्याकरिता राज्यात कलम 144 लागु केल्याने स्थानिक प्रशासना द्वारे काही दिवसान पुर्वी कन्हान शहरातली दुकाने बंद करण्यात आल्याने शहरातील व्यापारी दुकानदारांनी याचा विरोध करुन स्थानिक प्रशासनाची भेट घेत त्यांना सांगितले की आम्ही सर्व दुकानदार व नागरिक राज्य शासना च्या काटेकोरपणे पालण करीत असल्या वर ही कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे राज्य शासन वारंवार लॉकडाऊन ,संचारबंदी लावण्यात येत असल्याने दुकानदारांचे जगणे कठीण झाले असुन दुकानदारां वर उपासमारीची वेळ आली आहे जर कन्हान शहरातील स्थानिक नगर परिषद प्रशासन व कन्हान पोलीस प्रशासनाने समन्व याची भुमिका दाखवली तर दुकानदार कसे बसे तरी दुकाने नियमाप्रमाणे सुरु करून आपली रोजी रोटी कमवुन आपला परिवार चालवु शकतात . या वेळी कन्हान – कांन्द्री दुकानदार महासंघाने राज्य शासना च्या नियमाचे काटेकोरपणाने पालन ही करायला तयार असल्याची ग्वाही दिली तसेच कन्हान पोलीस स्टेशन चे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान निरीक्षक सुजितकुमार क्षीरसागर पोलीस उपअधिक्षक सुजिकुमार क्षिरसागर यांनी म्हटले की राज्य शासना कडुनं दिलेल्या निर्देशाचे नियमाचे पालन करण्यात यावे , सर्व दुकांनदाराने कोरोना चाचणी तपासणी करून रिपोर्ट पत्र ठेवणे बंधनकारक आहे अन्यथा कार्यवाही करण्यात येईल .
असे म्हणत कन्हान – कांन्द्री दुकानदार महासंघाने कन्हान – पिपरी नगर परिषद चे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे व
कन्हान पोलीस स्टेशन चे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान निरीक्षक सुजितकुमार क्षीरसागर पोलीस उपअधिक्षक सुजिकुमार क्षिरसागर यांना निवेदन देऊन कन्हान शहरातल्या व्यापारी दुकानदारांना वेळ देऊन दुकाने सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे .

या प्रसंगी कन्हान – कांन्द्री दुकानदार महासंघाचे सचिव प्रशांत बाजीराव मसार, सचिन गजभिए,शिवशंकर हलमारे, प्रदीप गायकवाड,अशोक मोरपाणा,बापु चकोले,ज्ञानेश्वर राजुरकर,अविनाश हातागडे,कमलेश हटवार ,चेतन वैद्य, योगेश दुहिजोड,सुनिल लक्षणे सह आदि दुकानदार उपस्थित होते .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …