Breaking News

*देशी दारू च्या १८२ पाव बॉटल सहीत दोन आरोपींना अटक* *कारवाई दरम्यान एक लाख चार हजार दोनशे रूपयाच्या मुद्देमाल जप्त*

*देशी दारू च्या १८२ पाव बॉटल सहीत दोन आरोपींना अटक*

*कारवाई दरम्यान एक लाख चार हजार दोनशे रूपयाच्या मुद्देमाल जप्त*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत बोरडा-कांद्री टोल नाका शिवारात अवैद्यरित्या दारू विकत असल्याच्या गुप्त माहीतीवरून कन्हान पोलीसांनी दोन आरोपींना पकडुन त्याच्या ताब्यातील देशी दारूच्या १८२ नीप व दुचाकी असा एक लाख चार हजार दोनशे रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक केली.

कन्हान पोलीस स्टेशन थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांना मिळालेल्या गुप्त माहीती वरून कन्हान पोलीसांनी पेट्रोलींग करित असतांना रविवार दिनांक११ ला सकाळी ८ ते ९ वाजता च्या दरम्यान आरोपी बाबु रामसेवक कश्यप वय ३८ वर्ष राहणार खदान नं.३ व आरोपी विजय दुर्गाप्रसाद तिवारी वय ३८ राहणा.खदान नं.६ हे दोघे मोटार सायकल वर अवैद्यरित्या दारू विकतांना बोरडा, कांद्री टोल नाका शिवारात मिळुन आल्याने त्यांच्या ताब्यातील देशी भिंगरी दारूच्या १८२ नीपा १८० मिली असलेल्या किंमत १९२०० रूपये व मोटरसाइकिल क्र. एम एच ४० सी एफ ०२४० किंमत ८५ हजार रूपये असा एकुण १ लाख ४ हजार दोनशे रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी बाबु रामसेवक कश्यप व विजय दुर्गाप्रसाद तिवारी विरूध्द कलम६५ (अ) (इ) महा. दारू बंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून अटक करित कारवाई केली. ही कार्यवाही कन्हान पोलीस स्टेशन चे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांचा मार्गदर्शनात एपीआई सतिश मेश्राम, एपीआई अमितकुमार आत्राम, पोशि सुघिर चव्हाण, शरद गिते, संजु बरोदिया यांनी यशस्वी पणे ही कारवाई केली.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …