Breaking News

*कोविड सेंटर चे मंत्री महोदयाचे हस्ते शुभारंभ*

*कोविड सेंटर चे मंत्री महोदयाचे हस्ते शुभारंभ*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर :संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रात कोरोना वायरसने थैमान घातले आहे याच बरोबर नागपूर हे अग्रस्थानी असून नागपूर जिल्ह्यातील सावनेर हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहे दर दिवसाला संपूर्ण सावनेर तालुक्यातील 400 चे वर रुग्ण पॉझिटिव्ह येत असल्याने सावनेर शहरात कोवीड़ रुग्णालयांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असल्याने क्षेत्राचे आमदार व क्रीडा युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी खाजगी डॉक्टरांना शहरात कोवीड़ रुग्णालय खाजगी स्वरूपात सुरू करण्याचे तसेच या करता लागणारी संपूर्ण मदत करण्याचे आव्हान केले होते करिता शहरात अनेक डॉक्टरांनी रुग्णालय सुरू करण्याचे ठरविले.

*40 बेड चे कृष्णा कोविड सेंटर सूरू*

या रुग्णालयाचे उद्घाटन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आले या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची तसेच व्हेंटिलेटर ची व्यवस्था राहील असल्याचे डॉक्टर मोंढे यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,पो नी मुलुक, कॉंग्रेस गटनेते सुनील चाफेकर, नगर सेवक दीपक बस्वार, आशिष मानकर, विजय बसवार,साहेबराव विरखरे उपस्थित होते.

सावनेर शहरात अजुन एक सुसज्ज कोवीड़ सेंटर उघडल्यिने तालुक्यातील नागरिकांना कोरोना संसर्गावर उपचारासाठी इतरत्र भटकंती करावयास लागणार नाही असे याप्रसंगी मंत्री महोदयानी सांगत म्हटले की अजुनही तालुक्यात कोवीड़ सेंटर उघडण्यासाठी डॉक्टर पुढाकार घेत आहे हे विशेष…

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …