Breaking News

★पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान ट्रस्ट कुही च्या वतीने★ “माती परिक्षण”या विषयावर कार्य शाळा संपन्न ★★

★पतंजली योगपीठ चा उपक्रम★


★पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान ट्रस्ट कुही च्या वतीने★


★★”माती परिक्षण”या विषयावर कार्य शाळा संपन्न ★★

तालुका वार्ताहर/कुही
पतंजली योगपीठ हरिद्वार च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान ट्रस्ट कुही च्या वतीने “माती परिक्षण”या विषयावर युवकांची कार्यशाळा संपन्न झाली.
  मांढळ येथील राममंदिरात पार पडलेल्या या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी युवा भारत चे केंद्रीय प्रभारी सचिनजी आर्य होते तर उदघाटक म्हणून भारत स्वाभिमान ट्रस्ट व पतंजली योग समिती नागपूरचे समन्वयक भाई प्रदीपजी काटेकर उपस्थित होते.मंचावर मिहान फुडपार्क उपक्रम मंडळाचे अधिकारी डॉ.किशोर दूबे,युवा भारत चे राज्यप्रभारी शंकर नागापुरे ,किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी रवीन्द्र आष्टनकर,अजय गुप्ता,देवस्थानचे ट्रस्टी नथ्थुजी सेलोकर  प्रामुख्याने उपस्थित होते.
   प्रथम पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.तालुका समितीच्या हस्ते सर्व पाहुण्यांचे पुष्पमालेने स्वागत करण्यात आले.
 नागपूर जिल्ह्याचे समन्वयक प्रदीप काटेकर यांनी सर्व उपस्थित युवकांना पतंजली योगपीठ हरिद्वार च्या देशात राबविण्यात येत अनेक उपक्रमार्पैकी नागपूर येथील मिहान येथे लवकरच फुडपार्क ला सुरुवात होत आहे.यासाठी “माती परिक्षण” हा उपक्रम हाती घेण्यात आला.केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी अतिशय मनस्वी उपक्रम राबवून शेतकऱ्यांच्या शेतातील अन्नधान्याचे उत्पन्न कसे वाढेल व शेतकरी सुखी कसा होईल.हा उद्देश ठेऊन आपल्या जिल्ह्यात नागपूर येथे उपक्रम राबविण्यात येत आहे.यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून १०० गावांची निवड करून माती परीक्षणासाठी प्रत्येकी दोन याप्रमाणे स्वयंसेवकांची निवड करावयाची आहे.त्यानुसार आजची ही कार्यशाळा आयोजित केली आहे.
  यानंतर कार्यशाळेचे अध्यक्ष सचिनजी यांनी पतंजली योगपीठ हरिद्वार द्वारा राबविण्यात येत असलेल्या अनेक उपक्रमांचा आढावा घेत पतंजली चा परिचय करून दिला.यानंतर डॉ.दुबे यांनी माती परिक्षण कसे करायचे याविषयी तांत्रिक माहिती दिली.कुही तालुक्याच्या योगप्रचारिका माधुरी ठाकरे यांनी योग शिबीर व योगशिक्षक प्रशिक्षण शिबीर आपल्या तालुक्यात सुरू करण्याविषयी माहिती दिली. या कार्यशाळेचे संचालन भारत स्वाभिमान ट्रस्ट व पतंजली योग समिती कुही तालुका प्रभारी प्रदीप घुमडवार याांनी केेले. तर आभार किसान समितीचे जिल्हा प्रभारी रवींद्र               आष्टनकार याांनी मानले.कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी लुकेश कुर्जेकार,रामभाऊ कोटांगले,शंकर देशमुख, पुरुषोत्तम नागलवाडे ,सुुधीर ठवकर याांनी अथक परिश्रम  घेतले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …