*कन्हान शहरात विविध संघटने द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती थाटात साजरी*
*विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन नागरिकांनी केले अभिवादन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहरात व परिसरात कोव्हिड 19 संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असुन राज्य शासनाच्या सर्व नियमाचे पालन करुन तसेच मास्क , सेनिटाइजर व सोशल डिस्टेन्स चे अंतर ठेवुन कन्हान येथे विविध संघटने द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .

*कन्हान पोलीस स्टेशन*
कन्हान पोलीस स्टेशन द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन सर्व प्रथम परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता एपीआई अमितकुमार आत्राम व सतीश मेश्राम यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवना वर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व पोलीस कर्मचार्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले .
*राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी व रीपा भीमशक्ती कन्हान*
राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी व रीपा भीमशक्ती कन्हान द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष चंन्द्रशेखर भिमटे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात केली असता कन्हान पोलीस स्टेशन येथे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमा भेट देऊन , व मास्क वाटप करुण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी दयाराम भोयर , अशोक पाटील , मोरेश्वर खडसे , नितिन मेश्राम , सोनु खोब्रागडे , राहुल बागडे , रविंन्द्र दुपारे ,प्रमोद दहिवलकर सह आदि नागरिक उपस्थित होते .

*कन्हान शहर विकास मंच*
कन्हान शहरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे राज्य शासनाच्या नियमाचे पालन करुन तसेच मास्क चा वापर करुन व सोशल डिस्टेन्स चे पालन करुन कन्हान शहर विकास मंच द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करण्यात आले .
बुधवार दिनांक १४ एप्रिल २०२१ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन मंच सचिव प्रदीप बावने यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता मंच महासचिव संजय रंगारी व हर्ष पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनावर मार्गदर्शन केले .
कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले . या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , हर्ष पाटील , सोनु खोब्रागडे , प्रकाश कुर्वे सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .
*गांधी चौक कन्हान*
कन्हान गांधी चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमा निमित्य प्रामुख्याने उपस्थित कन्हान येथील परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षिरसागर व सहाय्यक पोलिस निरीक्षक सतिश मेश्राम यांचा हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करूण विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच समाजिक कार्यकर्ता मोरेश्वर बर्वे , प्रशांत बाजीराव मसार,चंदन मेश्राम यांच्या वतीने कोरोणा संक्रमणाचा रोगराईपासून बचाव करण्याकरिता नागरिकांना मास्क व सेनिटाईझर वितरण करूण डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती थाटात साजरी करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक मोरेश्वर बर्वे,चंदन मेश्राम, प्रशांत बाजीराव मसार ,राजेश गजभिए ,मिलींद मेश्राम ,पकंज गजभिए , नितिन मेश्राम,गणेश खांडेकर,भोला भोयर,कुंदन रामगुंडे,विपीण गोंडाणे,सुरेश भाऊ, शुभम् मांदुरकर,आकाश बोरघरे,अविनाश हातागडे सह आदि नागरिक उपस्थीत होते .
*मटन मार्केट , कन्हान*
मटन मार्केट कन्हान येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा 130 वी जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेवर युवा कार्यकर्ता शाहरुख खान यांनी हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले . या प्रसंगी नितिन मेश्राम बादशाह पटेल , बिलाल पटेल, ऋषभ बावनकर, प्रकाश कुर्वे सह आदि नागरिक उपस्थित होते .

*टेकाडी ग्रामपंचायत , कन्हान*
टेकाडी ग्रामपंचायत येथे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेवर सरपंच सुनिता मेश्राम यांनी हार माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले . कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सुरेखा कांबळे , सिंधु सातपैसे , मायाबाई मनघटे , अरुण सुर्यवंशी , कर्मचारी सुनिता वानखेडे, विलाश सावरकर कुंदन शेडें ,बाळू नाईक, सह आदि उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज