Breaking News

*125 लोकं व 8 दुकानदार वरील कारवाईत 14380 रुपयांचा दंड* *ठाणेदार मारुती मुळूक यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी कार्रवाई*

*125 लोकं व 8 दुकानदार वरील कारवाईत 14380 रुपयांचा दंड*

*ठाणेदार मारुती मुळूक यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी कार्रवाई*

सावनेर – दि.15 एप्रिल 2021रोजी पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत पोलीस स्टेशन चे ठाणेदार मारुती मुळूक व सावनेर येथील अधिकारी व अंमलदार तसेच ग्रामपंचायत, नगर परिषद येथील कर्मचारी यांची संयुक्त मोहीम राबवून मास्क न वापरनारे, सोशल डिस्टन्स, मंडी मार्केट , भाजीपाला मार्केट,गर्दीचे ठिकाण, बस स्टॅंड ई. ठिकाणी 125 केसेस करून एकुण 12780/- रू दंड तसेच जीवनावश्यक दुकान व्यतिरिकत इतर दुकान सुरु मिळून आल्याने 8 केसेस करून 1600/- दंड असा एकूण 133 केसेस करून 14380/- रु दंड वसूल करण्यात आला.*

*सावनेर चे ठाणेदार व त्यांचे अधिनस्थ अधिकारी कर्मचारी सोबतच नगर पालीकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज सावनेर शहरात सकाळपासूनच एकच कारवाईचा बडगा उचलल्याने नगरीच्या रस्त्यावर सैरावैरा वावरणाऱ्यांन मधे भीतीचे सावट तर ज्या चौकात जावा त्यख चौकात पोलीसांची तैनाती असल्याने शहरातील रस्त्यावर ओस दिसुन आली तर रस्त्याला आपली जागीर समझुन स्टंटबाजी करणारे टवाळखोरांवर ही करडी नजर ठेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई मुळे शहरातील रहदारी सुलभ दिसुन आली सोबतच गर्दीचे ठीकाणीही ओस पडल्याचे दिसून आले.सावनेर पोलीसांनी आज केलेल्या कारवाईचे सर्वत्र प्रशंसा करण्यात येत असुन अश्या कारवाया नीयमीत व वरच्यावर करण्यात याव्यात अशी मागणी जोर घरू लागली आहे*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …