Breaking News

*लग्नसमारंभात गर्दी आढळल्यास आता होणार कारवाई* *गुन्हे नोंदवण्याबाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश*

*लग्नसमारंभात गर्दी आढळल्यास आता होणार कारवाई*

*गुन्हे नोंदवण्याबाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश*

गढ़चिरोली प्रतिनिधि – सूरज कुकुडकर

गडचिरोली  :सध्या गडचिरोली जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषत: ग्रामीण भागात लग्न, विवाह समारंभामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्याचे प्रमाण दिसून येत आहे, ज्यामुळे कोरोना साथरोग ग्रामीण भागातसुद्धा मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित करून लग्नसमारंभात उपस्थितांच्या संख्येपेक्षा अधिक लोक आढळल्यास त्या ठिकाणी वधुवर दोन्हीकडील व्यक्तींवर गुन्हे नोंदवण्यात येणार आहेत.

लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त २५ लोकांना उपस्थितीत राहण्यास परवानगी असून याचे उल्लंघन केल्यास संबंधित वर-वधु, त्यांचे आई-वडील, मंगल-कार्यालय/लॉन/सभागृह मालक, कॅटरर्स यांचेवर नियमाप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात येणार आहेत. तसेच संबंधित गावाचे तलाठी व ग्रामसेवक यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

एप्रिल मधील ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची आकडेवारी पाहता जिल्ह्यात कोरोना संसर्ग अधिक गतीने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच स्थानिक प्रशासनाला विविध ग्रामीण कार्यक्रमातील गर्दी कमी करणेबाबत व नियमानुसार कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याबाबत या अगोदरच सूचना करण्यात आले आहेत. त्यानुसार या आदेशाची अंमलबजावणी कडक स्वरूपात करणार असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

*जिल्ह्यात राखीव विलगीकरण कक्षाकरीता इमारती अधिग्रहीत*

*गडचिरोली,(जिमाका)दि.16*: राज्यात करोना विषाणूमुळे (Covid १९) उद्धलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी, गडचिरोली साथरोग अधिनियमाच्या नुसार सक्षम प्राधिकारी म्हणून गडचिरोली जिल्हयातील करोना विषाणूंचा संशयबाधित रूग्ण आढळल्यास त्यावर नियंत्रण होण्यास्तव अशा संशयबाधीत लोकांचे विलगीकरण करणेसाठी याद्वारे राखीव विलगीकरण कक्षाकरीता इमारती अधिग्रहीत केल्या आहेत. यात शासकीय मुलींचे आश्रमशाळा अहेरी, एकलव्य स्कूल अहेरी, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेची नवीन इमारत कोरची, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चामोर्शी यांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, दीपक सिंगला यांनी निर्गमित केले आहेत.

*11 मृत्यूसह आज 434 नवीन कोरोना बाधित तर 183 कोरोनामुक्त*

*गडचिरोली,(जिमाका)दि.16*: आज जिल्हयात 434 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 183 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 14019 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 11249 वर पोहचली. तसेच सद्या 2585 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 185 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. *आज 11 नवीन मृत्यूमध्ये* गडचिरोली तालुक्यातील कुरखेडा येथील 64 वर्षीय पुरुष, आरमोरी ता. कारागोटा 56 वर्षीय महिला, आरमोरी येथील 67 वर्षीय पुरुष , 71 वर्षीय पुरुष , धानोरा 52 वर्षीय पुरुष, चंद्रपूर ता. चिमूर येथील 72 वर्षीय पुरुष, चंद्रपूर ता. ब्रम्हपूरी 50 वर्षीय पुरुष, चंद्रपूर ता. सिदेवाही 61 वर्षीय पुरुष, चंद्रपूर ता. ब्रम्हपूरी 75 वर्षीय पुरुष, गोकूल नगर गडचिरोली 56 वर्षीय महिला, भंडारा ता. कुडेगांव 87 वर्षीय पुरुष, इ.चा मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.24 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 18.44 टक्के तर मृत्यू दर 1.32 टक्के झाला.

नवीन 434 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 165, अहेरी तालुक्यातील 68, आरमोरी 33, भामरागड तालुक्यातील 14, चामोर्शी तालुक्यातील 20, धानोरा तालुक्यातील 21, एटापल्ली तालुक्यातील 17, कोरची तालुक्यातील 12, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 17, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 04, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 09 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 42 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 183 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 75, अहेरी 14, आरमोरी 14, भामरागड 11, चामोर्शी 08, धानोरा 09, एटापल्ली 07, मुलचेरा 03, सिरोंचा 05, कोरची 04, कुरखेडा 06, तसेच वडसा 27 येथील जणाचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 12 जणांचा समावेश आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …