*कोणते हि अँप इन्स्टाँल करू नका अगोदर शहानिशा करा नंतरच अँप इन्स्टाँल करा – वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक बागूल*

*पोलीसांच्या मदतीने मिळाले पैसे परत*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- पाठवलेले पैसे कुरियर कुठेतरी अडकल्यामुळे विद्यार्थ्यांनी गुगल वरून नंबर घेऊन फोन केल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी एक ॲप इन्स्टॉल करण्यात सांगितले ॲप इन्स्टॉल करताच विद्यार्थ्यांच्या खात्यातून 50000 रूपे परस्पर उडाले अचानक पैसे गायब झाल्यामुळे त्याने सायबर क्राईम मध्ये तक्रार केली पोलीस कर्मचारी पूजा लोंढे हिने तांत्रिक तपास करीत पैसे परत मिळवून दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लकडगंज येते रा. राकेश जवाहरलाल डडुरे वय (28) यांचे स्टेट बँकेत खाते आहे. त्यांनी एका कंपनीला कुरियर द्वारे काही कागदपत्रे पाठवले होते. ते कुरियर आठ दिवस नंतरही न पोहोचल्यामुळे राकेश यांनी 4 फेब्रुवारीला माहिती घेतली मारुती कुरिअर कंपनीच्या गुगल वरून नंबर मिळवला त्या क्रमांकावर फोन केला असता तो सायबर गुन्हेगाराने अपडेट केलेला होता. आरोपीने कुरियर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले कुरियर साठी आणखी पाच रुपये ऑनलाईन पाठवावे लागतील असे सांगितले.
राजेश यांनी 5 रुपये पाठवण्यासाठी पेटीएम चा वापर केला. पाच रुपये येताच गुन्हेगाराने त्याला एनी डेस्क ॲप इन्स्टॉल करण्यास सांगितले. त्यानंतर लगेच राजेश यांच्या खात्यातून चक्क 50 हजार रुपये परस्पर काढून घेतल्या गेले. राजेश यांनी लगेच सायबर क्राईम कार्यालयात धाव घेतली. पोलिसांच्या सर्तकतेमुळे राजेशला परत मिळाले पैसे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाघ आणि पोलीस कर्मचारी पूजा लोंढे यांनी या प्रकरणाच्या तपास हाती घेतला तपासी अमलदार शिपाई पूजा लोंढे यांनी सातत्याने पेटीएम सोबत संपर्क करून त्यांना ई-मेल पाठवून पाठपुरावा केला शेवटी डंडूरे यांचे 50 हजार रुपये त्यांच्या खात्यात परत आणण्यात सायबर सेल ला यश आले. पोलीस अमलदार पूजा लोंढे यांच्या प्रयत्नामुळे सायबर गुन्हेगाराच्या घशात गेलेले पैसे परत मिळाले.
Maharashtra News Media सच की आवाज