*वराडा येथे प्रज्वल कुमार हेटे यांचा शेतात सत्तर हजार रुपयांची चोरी*

*फिर्यादी प्रज्वल कुमार हेटे यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी पुढील तपास सुरू केला*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत वडारा शिवारात फिर्यादी प्रज्वल कुमार हेटे यांच्या शेतातुन कोणीतरी अज्ञात ईसमाने ७०,००० (सत्तर हजार) रुपयांची चोरी केल्याने फिर्यादी प्रज्वल कुमार हेटे यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरुवार दिनांक १५ एप्रिल २०२१ ला फिर्यादी प्रज्वल कुमार हेटे हे आपल्या शेतात गेले असता त्यांचा शेतातल्या विहरी मध्ये लावलेली लुंबी कंपनीची तीन एच.पी ची मोटार किंमत अंदाजे ३५,००० रुपये दिसुन आलेली नाही व तसेच मोटार केबल किंमत अंदाजे ५,००० रुपये , पाईप रस्सा किंमत अंदाजे ५,००० रुपए , व मोटार पंप किंमत अंदाजे २५,००० रुपए असा एकुण ७०,००० रुपए किंमतीचा माल कोणीतरी अज्ञात ईसमाने चोरुन नेला व मोटार स्टार्टर चे नुकसान केले . असे फिर्यादी प्रज्वल कुमार हेटे यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध ३७९ भादवि सह गुन्हा दाखल केला . या प्रकरणाचा पुढील तपास परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .
Maharashtra News Media सच की आवाज