Breaking News

*कोरोना संक्रमित चौघांच्या मृत्यु प्रकरणाची चौकशी केली जाईल* *सांसद कृपाल तुमाने यांनी संबंधित अधिकार्यांना दिले चौकशी चे आदेश*

*कोरोना संक्रमित चौघांच्या मृत्यु प्रकरणाची चौकशी केली जाईल*

*सांसद कृपाल तुमाने यांनी संबंधित अधिकार्यांना दिले चौकशी चे आदेश*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कांन्द्री च्या जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात कोव्हिड 19 केअर सेंटर सुरु केले असुन संबंधित अधिकारी यांचा बेजबाबदार पणामुळे व जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात डाॅक्टर , नर्स , बेड्स , आॅक्सीजन , व इतर कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात चार कोरोना संक्रमितांचा मृत्यु झाल्याची अत्यंत दुर्देवी घटना घडल्यामुळे सांसद कृपाल तुमाने यांनी कांन्द्री च्या जवाहरलाल नेहरू चिकित्सालयाचा दौरा करुन पाहणी केली व संबंधित अधिकार्यांना कोरोना संक्रमित चौघांच्या मृत्यु प्रकरणाच्या चौकशी चे आदेश देण्यात आले आहे .
कांन्द्री च्या जवाहरलाल नेहरू चिकित्सालय हे घटने च्या तीन दिवसा अगोदर शासन – प्रशासनाने कोव्हिड 19 केअर सेंटर म्हणुन घोषित केले होते . परंतु जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात डाॅक्टर , नर्स , बेड्स , आॅक्सीजन , व इतर कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध न केल्यामुळे चौघांचा मृत्यु झाला . त्यामुळे मृतक कुटुंबीयांनी या घटनेचा विरोध करीत कन्हान पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती . या घटनेला अत्यंत गंभीर्याने लक्षात घेत सांसद कृपाल तुमाने व आमदार आशिष जयस्वाल यांनी शुक्रवार ला कामठी च्या वेकोलि च्या गेस्ट हाउस मध्ये संबंधित अधिकार्यांशी , वेकोलि च्या प्रमुख अधिकार्यांशी व जनप्रतिनिधि यांचाशी चर्चा करून सांसद कृपाल तुमाने यांनी या घटनेची माहिती घेतली व संबंधित अधिकार्यांना या घटनेच्या चौकशी चे आदेश देण्यात आले आहे .


सांसद कृपाल तुमाने यांनी म्हटले कि भविष्यात अश्या प्रकारे घटना नाही झाली म्हणुन जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात तात्काळ उपाय योजना करुन लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करण्यात येईल व जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात कोरोना रुग्णांच्या इलाज करण्याकरिता सर्व ४८ बेड्स वापरा तसेच कोरोना संक्रमितांचा उपचार करण्याकरिता जिल्हा परिषद चे जिल्हा चिकित्सा अधिकारी द्वारा पॅरामेडिकल स्टाफ आणि ऑक्सिजनची व्यवस्था करण्यास सहमती देण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर आणि वेकोली यांना आदेश दिले आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …