Breaking News

*टेकाडी ग्रा पं चे सचिव हरिदास रानडे यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने जाहीर निषेध*

*टेकाडी ग्रा पं चे सचिव हरिदास रानडे यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने जाहीर निषेध*


पारशिवनी तालुका प्रतिनिधी – कमलसिंह यादव

पारशीवनी – पोलीस पाटील संघटना , महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने पारशिवणी तालुक्यातील टेकाडी(को ख) ग्रामपंचायत चे व्ही. डी. ओ.(ग्राम सचिव)श्री. हरिदास रानडे यांनी राज्यातील पोलीस पाटील यांच्या बद्दल वृत्त पत्रातून चुकीचे वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यातील पोलीस पाटील यांच्या भावना दुखावल्या गेल्या.

टेकाडी ग्रा पं चे सचिव हरिदास रानडे यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करून त्यांच्यावर ती कडक कार्यवाही करण्यात यावी , यासाठी दिनांक 20 एप्रिल 2021 रोजी दुपारी नागपूर जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यपालन अधिकारी (पंचायत) मा. श्री . भोयर साहेब व पाराशिवनी पंचायत सामिती चे खंड विकास अधिकारी अशोक खाडे यांना त्यांच्या कार्यालयात भेटून सविस्तर चर्चा करून लेखी निवेदन देण्यात आले.

निवेदन देतांना संघटनेचे राज्य अध्यक्ष दिपक पालिवाल ,राज्य कार्यकारीनी सदस्य श्री. रामरावजी उके , श्री. योगेश लांजेवार, विर्दभ चे पोलिस पाटिल व पारशिवनी तालुका चे पोलिस पाटिल मोठी संखयेत उपास्थित होते

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …