Breaking News

*सार्वजनिक ठिकाणी तलवारीच्या धाकावर गुंडगीरी करणाऱ्यास अटक* *अवैधरित्या धारदार शस्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल, आरोपीला अटक*

*सार्वजनिक ठिकाणी तलवारीच्या धाकावर गुंडगीरी करणाऱ्यास अटक*


*अवैधरित्या धारदार शस्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल, आरोपीला अटक*

क्राइम रिपोर्टर
सावनेर : – सावनेर पो.स्टे.अंतर्गत वार्ड क्र . 5 सावनेर येथील सार्वजनीक रस्त्यावर दि.22/04/2021 चे 00.45 वा . 01 . 15 वा . सुमारास आरोपी बबलु जगदिश तिवारी वय 22 वर्ष , निजाम शेख दोन्ही रा . पहिलेपार सावनेर व रेहान खान रा . सटवामाता मंदिर सावनेर हे सार्वजनीक रस्त्यावर उभे राहुन हातामध्ये तलवार घेउन परीसरातील लोकांच्या मनात दहशत निर्माण व्हावी या उददेशाने हातामधिल तलवार फिरवीत व मोठमोठयाने ओरडुन व शिवीगाळ करीत होते.

*तसेच आरोपीतांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारन्याची धमकी दिली . सदर प्रकरणी फिर्यादी नामे- पवण राजेन्द्र राउत , वय 23 वर्षे रा . वार्ड 5 सटवामाता मंदिर सावनेर यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे . सावनेर येथे आरोपीविरुध्द कलम 4 , 25 भारतीय हत्यार कायदा सहकलम 504 , 506 , 34 भा.दं.वि. सहकलम 123 मपोका अन्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपी क . 1 ला अटक करण्यात आली आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास ठाणेदार मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा नारायण बोरकर पो.स्टे . सावनेर मो.क 9823581297 हे करीत आहे.


*वाढत्या कोरोना काळात सावनेर पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी कर्मचारी शहरातील रस्त्यावर फीरणारे सुपर स्प्रेडर व गर्दी करणार्यांवर पाळीत ठेऊन नाकेबंदी करूण नगरवासीयांच्या आरोग्यासाठी झटत आहे अश्यात काही गावगुंडाची “नीकल पडी” ते पळवाटा पकडून सार्वजनिक ठीकाणी आपले अधिपत्य गाजविण्याच्या तयारीत लागले असल्याने सदर प्रकार घटीत झाला.ज्या परिसरातील सार्वजनिक ठीकाणी हा जिवघेण्या दुर्दैवी प्रकार घडला तो परीसर अवैध दारू विक्री व असामाजिक तत्वांचे माहेरघर म्हणून शहरात ओळखले जाते सदर ठीकाणावरुण अनेक अनैतिक व्यवसायी आपल्या व्यवसायाचे संचालन करतात अशी खात्रीपूर्वक माहीती पुढे येत आहे.

*म्हणूनच सदर परिसरात आपली धाक जमावी याकरिता असे प्रयत्न सातत्याची बाब असल्याचे सुत्र आहे सध्याच्या वेळी सर्व पोलीस यंत्रणा कोवीड़ नियंत्रणात व्यस्त आल्याचा फायदा असे अवांछित तत्वांनी उचलण्यास सुरुवात केली असल्याने सदर क्षेत्रात वरच्या वर पोलीसांनी गस्ती वाढवून आकस्मिक सदर परिसरातील झडती घ्यावी अन्यथा कधीही मोठा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


*सदर प्रकरणावर आमच्या स्थानिक प्रतिनिधींशी बोलताना ठाणेदार मारुती मुळूक यांनी विश्वास व्यक्त केला की अश्यया गावगुंडाची गुंडगीरी खपवून घेतल्या जाणार नाही तसेच सदर परिसरात आता पोलिसांची करडी नजर राहणार असुन संशयीत गावगुंड व अवैध व्यवसायीकांच्या मुसक्या वरच्या वर आवरून शहरात शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्राथमीकता देण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे असे विचार व्यक्त केले*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …