Breaking News

*कन्हान शहरातुन कोरोना हद्दपार करण्यास औषध फवारणीने सॅनिट्राईझरेशन* *ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान-पिपरी चा जनहितार्थ सेवाभावी उपक्रम.*

*कन्हान शहरातुन कोरोना हद्दपार करण्यास औषध फवारणीने सॅनिट्राईझरेशन*

*ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान-पिपरी चा जनहितार्थ सेवाभावी उपक्रम.*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने पसरून दिवसेदिवस रूग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान द्वारे गुढीपााडव्याला सेनिटाइजेशन फवारणी अभियानाची सुरूवात करून प्रभाग क्रमांक. १ , २, ३ व ४ मध्ये कोरोना प्रतिबंधात्मक औषधीचे फवारणीने सॅनिटाईझेशन करण्यात आले.


ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान-पिपरी द्वारे गुढीपाढव्याचे औचित्य साधुन मंगळवार दिनांक.१३ एप्रिल ला सकाळी ७ वाजता ग्रामोन्नती प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री प्रकाश जाधव यांच्या अध्यक्षेत व कन्हान – पिपरी नगरपरिषद चे मुख्याधिकारी गिरिश बन्नोरे यांच्या हस्ते कन्हान शहरातुन कोरोना हद्दपार करण्याकरिता प्रभाग क्रमांक १ नाका नंबर ७ येथुन कोरोना प्रतिबंधात्मक औषधीचे फवारणीने सॅनिटाईझेशन करण्याचा शुभारंभ करून प्रभाग क्रमांक १ व २ चा महामार्ग, तारसा रोड, इंदिरानगर, शिवनगर, गजभिये लेआऊट, व सायंकाळी जुनिकामठी गावात फवारणी करण्यात आली. बुधवार दिनांक.१४ एप्रिल ला प्रभाग क्रमांक ३ व ४ चा तारसा रोड, राधाकृष्ण नगर, तुकाराम नगर, लोहिया लेआऊट, रामनगर परिसर आणि गुरूवार दिनांक.१५ एप्रिल ला हनुमान नगर, गणेशनगर, पाधन रोड, जवाहरनगर, शिवाजी नगर व धरंमनगर परिसर सॅनिटाईझेशन करण्यात आला. ही फवारणी दररोज सकाळी ६ ते ११ व सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यत करून संपुर्ण कन्हान शहर ग्रामोन्नती प्रतिष्ठाण द्वारे फवारणी करून शहरातील नागरिकांतील कोरोना विषाणुची भिती दुर करण्याचा पर्यंत व शहरातुन कोविड-१९ हद्दपार करण्यास जनजागृती करित जनहितार्थ सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहे. याप्रसंगी ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रकाश भाऊ जाधव, दिलीप राईकवार, मोतीराम रहाटे, गणेश भोंगाडे, महेश काकडे, चंद्रशेखर कळमदार, सचिन साळवी, प्रमोद निमजे, अजय ठाकरे, गोविंद जुनघरे, प्रविण गोडे, सुतेश मारबते, रवि कोतपल्लीवार, लक्ष्मीकांत पारधी, केतन भिवगडे, प्रमोद वानखेडे, निलेश गाढवे, ऋृषभ बावनकर, निशांत जाधव, ऋृषभ दुधपचारे, विनोद भेलावे, विषु गुप्ता सह नगर प्रतिनिधीनी उपस्थित राहुन सेवाकार्य केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …