*खदान नंबर ४ येथे युवकास डोक्यावर मारून जख्मी केले.*

*फिर्यादी यांचा तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि कामठी खुली खदान डम्पींग यार्ड च्या मातीतुन कोळसा व लोंखडाचे तुकडे वेचण्यास गेलेल्या भारत कारके यांचे वर आरोपीचे लोंखडाचे तुकडे घेतल्याचा शक लावुन वाद करून सायंकाळी फिर्यादीस आरोपीतांनी संगनमत करून फिर्यादी च्या डोक्यावर लोंखडी सळाख सारख्या चापट वस्तुने मारून जख्मी करून शिवीगाळ करित जिवे मारण्या ची धमकी दिल्याने कन्हान पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून आरोपींताचा शोध सुरू आहे.
शुक्रवार (दि.२३) ला सकाळी भारत शामलाल कारके वय २५ वर्ष रा. खदान नं ४ हा आपल्या भाऊ जी सोबत वेकोलि खुली खदान च्या नं ४ डम्पींग यार्ड जवळ कोळसा, लोंखडाचे तुकडे वेचण्याकरिता गेले असता तेथे आरोपी १) गणेश प्रजापती व २) सोनु प्रजापती दोन्ही रा. खदान नं ४ हे सुध्दा कोळसाचे, लोंखडाचे तुकडे मातीच्या डम्पींग यार्ड मधुन वेचत होते. तेव्हा आरोपीने जमा केलेले लोंखडी तुकडे दिसत नसल्याने ते फिर्यादीला शक लावुन बोलत होते की, तुम्ही च माझे लोंखडी तुकडे घेतले या कारणावरून फिर्यादी व आरोपी यांच्यात वाद झाला. यानंतर फिर्यादी व आरोपी आप आपल्या घरी निघुन गेले. फिर्यादी हा सायंकाळी ५ वाजता घरून झोपुन उठला व अनुप तिवारी यांचे घरासामोरून जात असतांना आरोपीतानी संगनमत करून फिर्यादी ला शिवीगाळ करून तु सबेरे हमारे से डम्पींग यार्ड मे ज्यादा की बात कर रहा था असे बोलुन गणेश प्रजापती यांनी फिर्यादी भरत कोरके ला लोंखडी सळाख सारख्या चापट वस्तुने डोक्यावर मारून जख्मी केले. तसेत आरोपीतांनी फिर्यादी ला हाथबुक्यानी मारहाण केली व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. सदर प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून कन्हान पोलीस स्टेशन येथे आरोपी विरूध्द कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ भादंवि कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीतांचा शो़ध घेत असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे जोसेफ साहेब हे करित आहे.
Maharashtra News Media सच की आवाज