Breaking News

*मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते तनुश्री डेडीकेटेट कोवीड़ सेंटर चे उदघाटन* *बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय धोटे,आयएमएचे अध्यक्ष डॉ. निलेश कुंभारे व पदाधिकाऱ्यांचा पुढाकार* *शहरात नव्याने सुरू झालेल्या 100 खाटांचे डेडीकेटेट कोवीड़ सेंटर नगरवासीयांच्या सेवेत*

*मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते तनुश्री डेडीकेटेट कोवीड़ सेंटर चे उदघाटन*

*बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय धोटे,आयएमएचे अध्यक्ष डॉ. निलेश कुंभारे व पदाधिकाऱ्यांचा पुढाकार*

*शहरात नव्याने सुरू झालेल्या 100 खाटांचे डेडीकेटेट कोवीड़ सेंटर नगरवासीयांच्या सेवेत*

 

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर : तालुक्यात दिवसेंदिवस कोकिड -१ ९ चा प्रादुर्भाव वाढत असल्याने व रूग्णांना शहराचे खर्च परवडत नसल्याने येथील डॉ . विजय धोटे यांनी पुढाकार घेवून खानगांव रोड वरील आशिर्वाद मंगल कार्यालय येथे तनुश्री डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल सुरू कोविड रूग्णांना समर्पित केले.


सदर कोवीड़ हॉस्पीटलचे उद्घाटन राज्याचे दुग्धविकास पशुसंवर्धन, क्रिडा व युवक कल्याण मंत्री मा . सुनील केदार यांच्या हस्ते पार पडले . यावेळी डॉ.विजय थोटे , समन्वयक आयएमएचे अध्यक्ष डॉ.निलेश कुंभारे , डॉ.उमेश जीवतोडे , संचालक डॉ.अमित बाहेती , डॉ . शिवम पुण्यानी , डॉ.परेश झोपे , डॉ . अशिष चांडक , डॉ . नितीन पोटोडे , अनेक डॉक्टरांची उपस्थिती होती.

*सावनेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून अनेक बाधित रुग्ण उपचारासाठी नागपूर येथे जावू शकत नाही , गेलेच तर तेथील खर्च परवडणारा नाही यासाठी येथील डॉ . विजय धोटे यांनी पुढाकार घेवून खानगाव रोडवरील आशिर्वाद हॉल ( मंगल कार्यालय )येथे १०० खाटंचे तनुश्री डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल सुरू केले असून जनसेवेचा भाव व शासकिय दरात उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आपल्या प्रास्ताविकातून दिली.


*तनुश्री डेडीकेटेट कोवीड़ सेंटर च्या उद्घाटन मा . मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी अनेक कोरोना रूग्ण आपला उपचार करण्यासाठी भर्ती झाले हे विशेष…*


*या उद्घाटनाप्रसंगी मा . मंत्री सुनील केदार यांनी आपल्या वक्तव्यात कोविड च्या रुग्णांना उपचार देण्यासाठी डॉक्टर आपला जिवधोक्यात टाकून नागरीकांचा प्राण वाचवित आसल्याने ते खरे कोरोना योद्धे असल्याचे डॉक्टरांप्रती गौरवोद्गार काढले . कार्यक्रमाचे संचालन करतांना डॉ . उमेश जिवतोडे यांनी डॉक्टरांना रेमडीसीवीर इंजेक्शन व प्राणवायु उपलब्ध होत नसल्याने मा.मंत्री सुनील केदार यांनी याकडे लक्ष देवून पुरवठा सुरळीता करण्याची विनंती केली . आभार डॉ . निलेश कुंभारे यांनी मानले*

*सावनेर शहर हे मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमा लागत असल्याने ग्रामीण भागातील लोकांना या कोवीड़ सेंटर चा लाभ नक्कीच होणार तसेच इंडीयन मेडिकल असोशीयेशन च्या सावनेर शाखे व्दारे कोरोनाच्या सुरूवातीच्या काळापासून भरीव कार्य केले आहे व ते निरंतर सुरू आहे अश्या जिवघेण्या महामारीत शहरातील युवा व उदयमान डॉ. शिवम पुण्यानी व डॉ.अमित बाहेती यांनी शहरात पहले कोवीड़ सेंटर उघडून कोरोना रुग्णांना सेवा देण्याचे कार्य सुरु केले व बधता बधता सावनेर शहरात तनुश्री कोवीड़ डेडीकेटेट या पाचव्या हाँस्पीटल ची सुरुवात मा.मंत्री महोदयांचे हस्ते सुरुवात झाली*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …