*पाणी पुरवठ्यावर प्राशासनाचे दुर्लक्ष*
*मागील ६ – ७ महीन्यापासून ब्लिचींग पावडर नाही*
*शहरात साथिच्या रोगाची भिती*
नरखेड तालुका प्रतिनिधि श्रीकांत मालधुरे
नरखेड – जिल्हातील सगळ्यात जुनी नगरपरिषद असलेली मोवाड नगरपरिषदेत दररोज १३ लाख लिटर पाणी पुरवठा केला जातो. संपूर्ण शहरात येणारे पाणी हे बोरवेल मधून येत आहे. १२०० ते १५०० फुटावरून येणारे पाणी असूनत्याय मोठ्या प्रमाणात शार आहे. या क्षारे मुळे शहरात सगळ्यात जास्त किडनी स्ट्रोन चे रुग्ण आहे.

शहरात मागील ६ – ७ महीन्यापासून होणाऱ्या पाणीपूरवठ्यात शहरातील ६ टाक्याच्या माध्यमातून शहराला पाणीपूरवठा होतो. मात्र कुठल्याच टाकीत ब्लिचींग पावडर चा वापर केला जात नाही. त्या मुळे शहरातील नागरीकांच्या मनात रोष निर्माण झाला आहे.
एकेकडे कोविड चा वाढता प्रादुर्भाव सोबत शहरात होणाऱ्या दूषीत पाणी पूरवठ्यामुळे टायफाईट चे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरातील ५ टक्के नागरिकांनकडे वॉटर फिल्टर ची व्यवस्था आहे . व इतर नागरिकांना थेट नाळाला येणारे पाणी प्यावे लागत आहे. त्या मुळे शहरात कोविड सोबत साथीचे रोग येणार काय अशी भिती निर्माण झाली आहे.
Maharashtra News Media सच की आवाज